CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

'गोवा आता किल्ल्यांसाठीही ओळखला जाणार', ऐतिहासिक किल्ल्यांना जागतिक पटलावर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा मास्टरप्लॅन

Goa Historical Forts Restoration Project: चर्च, मंदिर आणि समुद्र किनाऱ्यांबरोबरच गोवा ऐतिहासिक किल्ल्यांसाठीही जागतिक पटलावर ओळखला जावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Manish Jadhav

पणजी: गोव्यातील ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन करण्याचे काम सरकारने हाती घेतले असून चर्च, मंदिर आणि समुद्र किनाऱ्यांबरोबरच गोवा ऐतिहासिक किल्ल्यांसाठीही जागतिक पटलावर ओळखला जावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे, राज्यातील सर्व किल्ले नूतनीकरण करुन त्यांना नवीन झळाळी देण्याचे काम हाती घेण्यात आले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले. सुमारे 3 कोटी खर्चून साखळी येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या नूतनीकरण कामाचे उदघाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.

साखळीतील नवीन साज देण्यात आलेल्या किल्ल्यात राष्ट्रीय नाट्य विद्यालय व इंदिरा गांधी राष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र साकारले जाणार आहे. त्याचबरोबर यापुढे नगरपालिकेतर्फे नगरपालिकेत राष्ट्रीय दिवसांच्या निमित्ताने करण्यात येणारे ध्वजारोहण हे याच ऐतिहासिक किल्ल्यावर होणार, अशी घोषणाही मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी केली.

साखळीतील किल्ला हा पुढील 100 वर्षांसाठी नूतनीकरण करुन लोकार्पित करण्यात आला असून त्याची निगा ही सरकार बरोबरच साखळीवासीयांनीही घ्यावी. एवढचं नाहीतर या किल्ल्यामुळे साखळीच्या बाजाराला यापुढे नवीन ऊर्जा प्राप्त होणार असून लोकांनीही या किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

गोव्याचा (Goa) ऐतिहासिक वासरा जतन व संवर्धन करण्याचे काम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हाती घेतले असून स्वयंपूर्ण गोवाला चालना दिली. त्यांच्याच नेतृत्वाखाली गोव्यातील ऐतिहासिक किल्ल्यांना झळाळी मिळत आहे. हे सर्व साखळीवासीयांच्या सहकार्य व पाठिंब्यामुळे शक्य होत असून यापुढेही होणार, असे नगराध्यक्षा सिध्दी प्रभू यांनी म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

Goa Weather Update: मुसळधार पावसानंतर राज्यात दिलासादायक चित्र; पावसाचा जोर ओसरला, शेतकरी हवालदील

Noida Fire: नोएडातील पाच मजली इमारतीला भीषण आग; दोन जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू

Rohit Sharma Viral Video: रोहित शर्माचा आक्रमक अवतार? भर मैदानात 'या' खेळाडूला मारली लाथ, कॅमेऱ्यामागे नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: HRA मध्ये अपेक्षेपेक्षा मोठी वाढ होण्याची शक्यता; फिटमेंट फॅक्टर ठरणार निर्णायक, पाहा संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT