cm pramod sawant Dainik Gomantak
गोवा

छत्रपतींच्या प्रेरणेमुळेच गोव्यातील धर्मपरिवर्तन रोखले गेले...! मुख्यमंत्री सावंतांचे पर्वरीत मराठा संकुलाच्या लोकार्पणात मोठे विधान

cm pramod sawant inaugurates maratha sankul porvorim: मराठा समाजाचे प्रेरणास्रोत हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्यामुळेच गोव्यात धर्मपरिवर्तन रोखण्यात आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मराठा समाजाचे प्रेरणास्रोत हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्यामुळेच गोव्यात धर्मपरिवर्तन रोखण्यात आले. गोव्याच्या मुक्तिलढ्यात देखील अनेक मराठा समाजाच्या स्वातंत्र्यसैनिकांनी योगदान दिले आहे. मुक्त गोव्याच्या जडणघडणीत देखील मराठा समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान असून या राज्याच्या विकासात सदोदित त्यांचा वाटा राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

पर्वरी (Porvorim) येथील मराठा संकुलाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, उल्हास तुयेकर, राजेश फळदेसाई, अध्यक्ष सुहास फळदेसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, की मराठा संकुलाच्या उभारणीत अनेकांचे योगदान आहे. समाजासाठी अनेकांनी सढळ हस्ते मदत केली आहे. सामाजिक बांधिलकी जपत समाजाच्या तरुणाईला योग्य मार्गदर्शन करत शिष्यवृत्ती, त्यांच्यासाठी कोचिंग क्लास आदी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात ‘जो शिकेल तोच टिकेल’ असे त्यांनी व्यक्त केले.

पूर्वी अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण असायचे; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या कोणत्याही जातीतील व्यक्तीला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. सर्व समाजांचा विकास आणि उन्नतीला चालना दिली. त्याचा लाभ आज अनेकांना होत असून राज्य पातळीवर सर्वांत पहिल्यांदा याची अंमलबजावणी गोव्यात (Goa) करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

व्यसनमुक्तीसाठी जागृती करावी

व्यसन ही आजच्या समाजाला लागलेली मोठी कीड आहे. ती रोखण्यासाठी त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक संघटना आणि समाज म्हणून प्रत्येकाचे आपली सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेत जागृती करणे जरूरीचे आहे. सक्षम आणि विकसित गोवा घडविण्यासाठी ही काळाची गरज असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.

ज्ञातीबांधवांची इच्छा पूर्ण : फळदेसाई

मराठा समाज संकुलाचे काम पूर्ण व्हावे, ही सर्व ज्ञातीबांधवांची इच्छा होती, ती आज पूर्ण होत आहे. आम्हाला अजून बरीच वाटचाल करायची आहे. कुठल्याही समाजाचा, धर्माचा द्वेष न करता आम्हाला पुढे जात समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करणे गरजेचे असल्याचे मत समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Republic Day 2026 Wishes: भारतात जन्मलो, हेच माझे भाग्य महान! प्रजासत्ताक दिनी शेअर करा 'हे' शुभेच्छा संदेश

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; गॅरेजमध्ये झोपलेल्या 23 वर्षीय तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं VIDEO

Tamborim Verca: तांबोरी-फात्राडे किनाऱ्यावर तणाव! स्‍थानिकांनी राेखली रेतीची वाहतूक; Watch Video

Goan Ghost Stories: पर्वरीत पांढऱ्या वेषातील बाई दिसली, मांडवी पुलावर पोचेपर्यंत त्या भुताने माझा पाठलाग केला; भुतांचे अस्तित्व

Viral Video: जुगाड की वेडेपणा? एक कार अन् 50 प्रवासी! व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण, म्हणाले, 'हे भारतातच शक्य'!

SCROLL FOR NEXT