Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

शरद पवारांचे निकटवर्तीय लागणार भाजपच्या गळाला? गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूरात घेतली बड्या नेत्याची भेट

सावंत शिवसेनेच्या संपर्क कार्यालयास ते भेट देऊन शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Pramod Yadav

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) हे आजपासून दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी सोलापूर विमानतळावर आगमन झाले. काहीवेळा आधी त्यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. तुळजापूरला जाण्याआधी त्यांनी सोलापुरातील विविध ठिकाणी भेटी दिल्या.

आज दिवसभर सावंत हे सोलापूर, अक्कलकोट, माढा, मोहोळ, पंढरपूरला भेटी देणार आहेत.

प्रमोद सावंत आपल्या भेटीत राष्ट्रवादीचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील ( NCP Rajan Patil) यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. राजन पाटील हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे (Sharad Pawar) मानले जातात अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. दरम्यान, मोहोळ तालुक्यात माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटल यांचा संघर्ष उघड आहे.

काही दिवसांपूर्वी राजन पाटील आणि माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांनी अमित शहांची भेट घेतली होती. त्यात आज प्रमोद सावंत यांनी भेट घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे माजी आमदार भाजपच्या गळाला लागणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सोलापुरात सुरू आहे.

याशिवाय सावंत यांनी माजी सहकार मंत्री, भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या घरीही त्यांनी भेट दिली. सावंत शिवसेनेच्या संपर्क कार्यालयास ते भेट देऊन शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

असा आहे प्रमोद सावंत यांचा दौरा

22 ते 23 फेब्रुवारी हे दोन दिवस मुख्यमंत्री प्रमोद सावंत महाराष्ट्रात असणार आहेत. दरम्यान आज सकाळी त्यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. माजी आमदार राजन पाटील यांची भेट घेतल्यानंतर, दुपारी एक वाजता ते माढा येथील एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.

दुपारी तीनच्या सुमारास पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिराला भेट देऊन देवदर्शन करणार आहेत. तेथून परत माढा येथील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी पाच वाजता शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी, रात्री सात वाजता अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणार आहेत.

23 फेब्रुवारी रोजी सकाळी 09 वाजता सोलापूर विमानतळाहून कोल्हापूरकडे जाणार आहेत. साडेनऊ वाजता कोल्हापूर येथील श्री. महालक्ष्मी मातेचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर टेंबळाईवाडी, कनेरी मठातील येथील सिध्देश्वर मंदीरात दर्शन घेऊन ते कोल्हापूर विमानतळाहून गोव्याकडे प्रयाण करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: एकाच घरात पाच जणांचे मृतदेह आढळले! दोन मुली, 12 वर्षांचा मुलगा आणि आई-वडिलांचा मृत्यू; परिसर हादरला, घटनेमागचं कारण काय?

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार एरियर? जानेवारी 2026 पासूनच्या थकबाकीबाबत जाणून घ्या ताजे अपडेट

FIR Case: 2017 च्या विमान प्रकरणात मोठा न्यायालयीन निर्णय; राज्यपालांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातील मागणी फेटाळली

Goa Politics: गोवा फॉरवर्डची विरोधकांना एकत्र येण्याची हाक; काँग्रेससह सर्व पक्षांशी तातडीने चर्चा करणार

Pakistan Players Central Contract: "सॅलरी पाहिजे? मग आधी खेळायला शिका!", मोहसिन नक्वीने रोखले खेळाडूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स; काढला नवा फतवा

SCROLL FOR NEXT