Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa School: 'त्या' अभियंत्यांची आता खैर नाही! शाळांमधील दुरुस्तीच्या कामातील दिरंगाईवर मुख्यमंत्र्यांचा संताप, आलेमाव यांचा सरकारवर हल्लाबोल

Goa School Renovation Delay: राज्यातील शाळांमध्ये सुरु असलेल्या दुरुस्तीच्या कामात झालेल्या दिरंगाईवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कामात उशीर करणाऱ्या अभियंत्यांची मी चौकशी करुन यासाठी जबाबदार असलेल्या अभियंत्यावर योग्य कारवाई करु, अशी तंबीच मुख्यमंत्र्यांनी दिली.

Manish Jadhav

पणजी: राज्यातील शाळांमध्ये सुरु असलेल्या दुरुस्तीच्या कामात झालेल्या दिरंगाईवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कामात उशीर करणाऱ्या अभियंत्यांची मी चौकशी करुन यासाठी जबाबदार असलेल्या अभियंत्यावर योग्य कारवाई करु, अशी तंबीच मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्य शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले की, 38 शाळांपैकी 18 शाळांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. मात्र, 15 ते 20 शाळांमध्ये अद्याप स्वच्छता, इलेक्ट्रिकल कामे प्रलंबित आहेत. ताळगाव प्राथमिक शाळेत मुसळधार पावसामुळे (Rain) अडथळा निर्माण झाला. एक कामगार उंचीवरुन पडला तर दुसऱ्याला विजेचा झटका बसल्याने काम थांबले.

युरी आलेमाव यांची जोरदार टीका

दुसरीकडे मात्र शिक्षण (Education) क्षेत्राकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सावंत सरकारवर टीकास्त्र डागले. गेल्या महिन्यात शाळांच्या दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित करुनही सरकारने तातडीने कारवाई न केल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही आलेमाव यांनी केला.

आलेमाव पुढे म्हणाले की, “गेल्या महिन्यात मी विधानसभेत अनेक शाळांच्या दुरुस्तीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. परंतु आजतागायत सरकारने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. याचा थेट फटका विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना बसत आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य आणि शिक्षणाची गुणवत्ता यांच्याकडे सरकारचे दुर्लक्ष ही अत्यंत गंभीर बाब आहे.”

आलेमाव यांच्या मते, प्राथमिक शाळा, शासकीय शिक्षण संस्था आणि ग्रामीण भागातील शिक्षण सुविधा दिवसेंदिवस खालावत चालल्या आहेत. त्याकडे सरकारचे लक्ष वेधूनही कोणतीही तातडीची कारवाई होत नाही. शिक्षण हे सरकारच्या अजेंड्यातच नाही. आलेमाव यांच्या घणघोर टीकेमुळे सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागातून पालक आणि शिक्षकांकडून याविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

SCROLL FOR NEXT