Goa Schools Reopened: अखेर इतिहास घडला! गोव्यात पहिल्यांदाच एप्रिलमध्ये सुरु झाल्या शाळा, पालकांकडून मात्र विरोध

Goa Education: नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात करताना काही पालकांनी शिक्षण संचालनालयाबाहेर एकत्र येत विरोध केला.
Goa Schools Reopened
Goa Schools ReopenedDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ... आणि अखेर इतिहास घडला ! गोव्यात पहिल्यांदाच इयता सहावी ते बारावी (अकरावी वगळता) नवीन शैक्षणिक वर्षाला सोमवारपासून (०७ एप्रिल) प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. काही पालकांनी शिक्षण संचालनालयाबाहेर एकत्र येत वर्गाला विरोध केला; परंतु यापूर्वी कोटनि दिलेल्या निर्णयामुळे त्याची धार बोथट झाली.

बहुतांश शाळांमध्ये सरासरी ९० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह होता. काही शाळांनी विद्यार्थ्यांना फुले, फळे आणि वह्या देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. दुपारी ११.३० वा. शाळा सोडण्यास आल्या. बहुतांशी शाळांमध्ये उष्म्याचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी योग्य ती काळजी, पिण्याचे पाणी आदी व्यवस्था सुरळीत करण्यात आली आहे.

Goa Schools Reopened
Russian Arrested In Goa: गोव्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रशियन मायलेकाला अटक

पहिल्यांदाच एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्यात आल्याने विद्यार्थी, शिक्षकांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी तिसवाडी तालुक्यातील काही शाळांमध्ये भेट देत शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे आणि गोवा बोर्डचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

पालकांना वेठीस धरू नका

नवीन शैक्षणिक वर्षाला ज्यांचा विरोध होता त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. पंरतु उच्च न्यायालयाने पालकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्याचा नर्णय दिल्यावर हा विषय संपायला हवा होता. परंतु काही जण आताही विरोध करत आहेत. या विरोधामागे नेमका उद्देश काय आहे सर्व पालकांनी ओळखणे गरजेचे असल्याचे मत सचिव प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले.

Goa Schools Reopened
AAP Goa: आम आदमीच्या नेत्याला पोलिसाने मारहाण केल्याचा दावा; दोन्ही आमदार आक्रमक, निलंबनाची मागणी

पालकांचे आंदोलन!

नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात करताना काही पालकांनी शिक्षण संचालनालयाबाहेर एकत्र येत विरोध केला. यासंबंधी सांगताना पालक सीसील रॉड्रीगीस म्हणाल्या, आम्हा पालकांना विश्वासात घेतले नाही. आमचे मुद्दे मांडण्यासाठी बैठक घेण्यासंबंधीचे आश्वासन शिक्षण सचिवांनी दिले होते. परंतु ते आश्वासन पाळण्यात आले नाही. आमचा एनईपीला विरोध नाही परंतु ज्याप्रकारे त्याची अमंलबजावणी केली जातेय ती योग्य नाही. त्यामुळे आम्ही विरोध करत असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com