Archbishop Filipe Neri Cardinal Ferrao Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्र्यांचा इशारा आणि अवघ्या 24 तासांतच आर्च बिशपांची ख्रिस्ती धर्मगुरूंना तंबी, म्हणाले पूर्ण ख्रिस्ती समुदायाने...

दोन प्रकरणांची दखल : धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये करू नका!

गोमन्तक डिजिटल टीम

Archbishop Filipe Neri Cardinal Ferrao धार्मिक भावना दुखावणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करू, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्यावर 24 तासांतच आर्च बिशप फिलीप नेरी फेर्रांव यांनी संबंधित ख्रिस्ती धर्मगुरूंना असे प्रकार करू नये, अशी सक्त ताकीद दिली आहे.

बिशप पॅलेसमधून ही माहिती प्रसारित करण्यात आली. यापूर्वी असा प्रकार घडूनही आर्च बिशपांनी त्याबाबत मौन बाळगणे पसंत केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी कोणीही, कुठेही असे वक्तव्य केले तरी त्याला पाठीशी घालणार नाही, असा स्पष्ट संदेश दिल्यावर चर्चला भूमिका स्पष्ट करावी लागली.

चर्चमध्ये प्रवचन करताना इतर धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणाची अखेर आर्च बिशपांनी दखल घेतली आहे.

असे कृत्य केलेल्या ख्रिस्ती धर्मगुरूंना भविष्यात असे प्रकार न करण्याची ताकीद दिली असून पूर्ण ख्रिस्ती समुदायाने इतरांच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करू नये किंवा कृती करू नये, असे आवाहन बिशप पॅलेसच्या पत्रकात केले आहे.

चर्चने केली भूमिका स्पष्ट

चर्चने पत्रकात नमूद केले आहे की, आम्हाला मनापासून खेद वाटतो की, चर्चच्या काही सदस्यांनी अलीकडील काही घोषणा आंतरधर्मीय संवाद आणि परस्पर आदराच्या अस्सल भावनेच्या विरोधात गेल्या आहेत.

आम्ही खात्री देऊ इच्छितो की, चर्चच्या नेतृत्वाने त्यांच्या संदर्भात योग्य ती कारवाई केली आहे आणि भविष्यात असे उच्चार टाळण्याबद्दल त्यांना कडक ताकीद दिली आहे.

‘ती’ विधाने दुर्दैवी : चर्चच्या काही सदस्यांनी अलीकडेच सार्वजनिकपणे वापरलेल्या काही विशिष्ट अभिव्यक्तींमुळे इतर धार्मिक परंपरांच्या लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, हे दुःखदायक आहे. इतर धर्मांबाबत चर्चची भूमिका स्पष्ट करण्यासाठी हे विधान जारी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

Trigrahi Yog 2026: सूर्य, बुध आणि शुक्राचा महासंगम! 17 अक्टोबरपासून सुरु होणार 'या' राशींचा सुवर्णकाळ; जबरदस्त धनलाभाचा योग

SCROLL FOR NEXT