CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: गोमंतकीयांनो सावधान, भुलथापांना बळी पडू नको; वाढत्या फसवणूकीच्या घटनांवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Human Trafficking: गोव्यात सध्या जॉब रॅकेटचे प्रकरण गाजत असतानाच मानवी तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला. सराफांना लुटणारेही राज्यात वावरत आहेत.

Manish Jadhav

साखळी: गोव्यात सध्या जॉब रॅकेटचे प्रकरण गाजत असतानाच मानवी तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला. सराफांना लुटणारेही राज्यात वावरत आहेत. त्यामुळे गोमंतकीयांनी जागरुक राहून कोणत्याही प्रकारच्या भुलथापांना बळी पडू नये.

गोवा सरकार आणि पोलीस खाते फसवणूक करणाऱ्यांवर लक्ष ठेऊन आहेत. परंतु लोकांनी अशा फसवणूक करणाऱ्या घटकांच्या आहारी जाऊन बळी पडू नये. असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे बोलताना आज (19 नोव्हेंबर) केले.

दरम्यान, साखळीत बाळकृष्ण वेर्णेकर यांच्या वेर्णेकर्स डिझायनर ज्वेलर्स या शोरुमचे उदघाटन केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी व्यासपिठावर साखळीच्या नगराध्यक्षा सिध्दी प्रभू पोरोब, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी, उपनगराध्यक्षा दिपा पळ, अखिल गोवा ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर कुडतळकर, मालक बाळकृष्ण वेर्णेकर, प्रकाश वेर्णेकर आणि इतर उपस्थिती होते.

गोव्यात वेगवेगळ्या फसवणूकीच्या पध्दतीच्या घटना घडू लागल्या आहेत, प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. प्रथमच गोवा पोलिसांनी मानवी तस्करीच्या प्रकरणाचा पर्दाफाश करून नोकरीचे आमिष दाखवत आखातात नेलेल्या एका मुलीला मस्कत या राष्ट्रातून सोडून आणले. यात गुंतलेल्या दलालांनाही अटक केली.

सराफी व्यवसायातही अशीच रेकेट वावरत असून इतर राज्यातून पोलिसांना घेऊन येत आपण सोने अमूक सराफ्याला विकले आहे असे सांगून त्यांच्याकडून ते परत घेण्यासाठी दबाव आणाणे, अशा गोष्टी घडू लागल्या आहेत. याविषयी आम्ही, सामान्य लोकांनी, व्यवसायिकांनी, स्वराज्य संस्थांनी सतर्क राहून इतरंनाही जागृत केल्यास अशा फसवणुकीचे प्रकार आटोक्यात आणणे शक्य आहे. गोव्यातील पोलीस अशा फसवणुकीच्या प्रकरणाचा पर्दाफाश करतच आहेत. ज्वेलर्सना टोपी घालण्याचे सत्र सुरू झाले आहे.

कोणतीतरी तक्रार झाल्यामुळे त्यांच्याकडे येऊन त्यांना ताब्यात घेणे, चोरीचे दागिने सराफांना विकल्याए सांगून त्यांची सतावणूक करणे, अशा गोष्टी घडत आहेत. अशी प्रकरणे मोडून काढण्यासाठी सरकार काम करीत आहे. त्यात लोकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. असेही यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री गोविंद गावडेंच्या कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 'दीपराज' करणार गोव्याचं नेतृत्व; सुयश उपकर्णधार!

Goa News: लखनौला जाणारे विमान उड्डाणानंतर 20 मिनिटांनी माघारी परतले, गोंधळाची स्थिती; गोव्यातील ठळक घडामोडी!

St. Xavier Exposition: शव प्रदर्शनाला 8 दशलक्ष लोकं हजेरी लावण्याची शक्यता; गोव्यात होणार 45 दिवसांचा भावदीव्य सोहळा

Govind Gaude: मंत्री गोविंद गावडेंच्या अडचणी वाढणार? Cash For job Scam प्रकरणात कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT