CM Pramod sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: करिअरसंदर्भात मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे स्पष्टीकरण, म्हणाले, 'हिंदी भाषा शिकणाऱ्यांना...

साहित्य आपल्या आतील माणसाला दृष्टी देते.

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant राष्ट्रभाषा असून देखील हिंदी आपण कमी वाचतो आणि शिकतो. हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून फक्त आपण हिंदी ऐकतो पण हिंदी शिकणाऱ्यांना आज राष्ट्रीय स्तरावर वाव आहे.

करिअर निश्चित करण्यासाठी देखील हिंदी महत्वपूर्ण भाषा ठरणार आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे व्यक्त केले. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी) तर्फे संस्थेच्या सभागृहात हिंदी सृजनोत्सव २०२३ ''युवा प्रतिभा'' कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते.

व्यासपीठावर मुख्य अतिथी नामवंत लेखिका डॉ. अलका सरावगी, विशेष पाहुण्या प्रसिद्ध लेखिका जयश्री रॉय हरमलकर, संस्थेचे अध्यक्ष तथा कवी दशरथ परब, सदस्य सचिव मिलिंद माटे, कार्यक्रमाच्या आयोजन प्रमुख डॉ. आशा गेहलोत उपस्थित होते.

व्यावसायिक महाविद्यालयात अभ्यासक्रम (सिलॅबस) आता स्थानिक भाषांत उपलब्ध असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी दिली.

डॉ. अलका सरावगी म्हणाल्या की, हिंदी भाषेचा एक धागा कितीतरी भाषांना बांधून ठेवतो. भाषेच्या माध्यमातून आपण मनातल्या गोष्टी एक दुसऱ्याला सांगत असतो.

साहित्य आपल्या आतील माणसाला दृष्टी देते. जीवनाला अधिक समजून घेण्याची क्षमता साहित्यामुळे लाभते. डॉ. सरावगी यांनी समई प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्‍घाटन केले.

यावेळी संस्थेचे कार्यकारी सदस्य सागर जावडेकर, प्राचार्य महेश वेंगुर्लेकर, उज्वला तारकर व कालिका बापट उपस्थित होते.

दशरथ परब यांनी स्वागत केले. डॉ.आशा गहलोत यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अर्चना गायतोंडे यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद माटे यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Roy Naik: 'आपली तयारी, पण पक्षाचा निर्णय अंतिम'! फोंड्यातील पोटनिवडणुकीबद्दल रॉय नाईकांचे स्पष्टीकरण

Uguem Firing: कोणी केला गोळीबार? उगवे प्रकारणानंतर राज्यात खळबळ, 7 जण ताब्यात; दोन्ही जखमी कामगार बिहारचे

Horoscope: कामात यश, प्रेमात स्थैर्य आणि पैशात वाढ; आजचा दिवस कोणासाठी भाग्यवर्धक?

Honda 0 Series EV: होंडाची EV सेगमेंटमध्ये 'धमाल'! 'झीरो सीरिज'मधील 'ही' दमदार SUV लवकरच भारतात होणार लॉन्च; टाटा नेक्सॉनला देणार कडवी टक्कर

Viral Video: दूध सांडले, पाणी सांडले, मार मात्र एकालाच! आई-मुलाच्या वादाचा मजेदार VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांनीही घेतली मजा; म्हणाले...

SCROLL FOR NEXT