CM Pramod Sawant @ANI
गोवा

Bihar Election Results 2025: 'बिहारच्या जनतेनचा पुन्हा PM मोदींवर विश्वास', मडगावात मुख्यमंत्री सावंतांनी कार्यकर्त्यांसोबत केला NDA चा विजयोत्सव साजरा!

Goa BJP Celebration: भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळत असलेल्या स्पष्ट आणि निर्णायक आघाडीमुळे गोव्यातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Manish Jadhav

मडगाव: शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2025 रोजी बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असतानाच, भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळत असलेल्या स्पष्ट आणि निर्णायक आघाडीमुळे गोव्यातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या महत्त्वपूर्ण राजकीय यशाचा आनंद साजरा करण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह भाजपचे हजारो कार्यकर्ते मडगाव येथे एकत्र आले आणि त्यांनी जोरदार जल्लोष केला.

एनडीएच्या विजयाची नोंद आणि उत्साह

सकाळपासूनच बिहारमधील (Bihar) निकालाचे कल स्पष्ट होऊ लागले. भाजप, जेडीयू आणि त्यांच्या मित्रपक्षांनी मिळून निवडणुकीत एकहाती बहुमत मिळवण्याच्या दिशेने दमदार वाटचाल सुरु केल्याचे चित्र समोर आले. या विजयाची नोंद होताच, भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा प्रभाव गोव्यातील कार्यकर्त्यांवरही दिसून आला. मडगावमधील भाजपच्या प्रमुख कार्यालयाजवळ आणि मुख्य चौकात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. घोषणाबाजी आणि ढोल-ताशांच्या आवाजात परिसर दुमदुमून गेला. विजयाच्या आनंदाचे प्रतीक म्हणून कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवली आणि मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतिषबाजी केली.

मुख्यमंत्र्यांकडून 'सेवा, सुशासन आणि विकासा'च्या विजयाचा गौरव

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या जल्लोषात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना बिहारच्या जनतेचे आणि स्थानिक नेतृत्वाचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, "बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि एनडीएच्या सेवा, सुशासन आणि विकास या धोरणांवर विश्वास व्यक्त केला आहे. बिहारमध्ये एनडीएला मिळालेली ही ऐतिहासिक आघाडी आणि विजय संपूर्ण देशासाठी एक सकारात्मक संकेत आहे.''

ते पुढे म्हणाले, "हा विजय केवळ राजकीय नसून, तो विकासाच्या आणि स्थिर सरकारच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब करणारा आहे. भाजपचे विचार आणि कार्यपद्धती देशाच्या कानाकोपऱ्यात स्वीकारली जात आहे, याचा हा पुरावा आहे. गोव्यातील प्रत्येक भाजप कार्यकर्ता बिहारमधील या यशाने प्रेरित झाला आहे."

राष्ट्रीय राजकारणाला नवी दिशा

यावेळी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी हा विजय आगामी काळात गोव्यातही विकासाची गती वाढवण्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. बिहारच्या निकालामुळे भाजपची राष्ट्रीय स्तरावरची पकड अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास संचारला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर रस्त्यात काकाची 'दारु पार्टी'! कुणाचीही हटवण्याची हिंमत नाही, व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले, "काका ऑन रॉक"

VIDEO: बुमराहच्या तोंडून निघाली शिवी, बावुमाच्या उंचीवर केलेलं वक्तव्य व्हायरल; म्हणाला, 'बौना भी तो है यह...'

Bihar Election Result Memes: नेहरुंच्या वाढदिवसापासून 'पंचायत'मधील डान्सपर्यंत...! बिहार निकालावर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस VIDEO

Pooja Naik: 'गोव्याचे लोक मला ओळखतात', ढवळीकरांनी दिली प्रतिक्रिया; पूजा नाईकच्या आरोपांवर नेमकं काय म्हणाले? पाहा VIDEO

"त्याला संघात का घेतलं?" टीम इंडियाच्या निवडीवर माजी क्रिकेटपटू संतापला, 'या' खेळाडूला वगळल्याने नाराजी

SCROLL FOR NEXT