Arvind Kejriwal Goa AAP
गोवा

'खराब रस्त्यांच्या दुरुस्तीची सुरू, 15 दिवसांत काणे पूर्ण होणार'; आपच्या निवेदनानंतर CM सावंतांची माहिती

Goa News: राज्य सरकारने याची गंभीर दखल घेत रस्त्यांवरील खड्डे बुजवावे तसेच खराब झालेल्या रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी 'आप'कडून होत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सध्या सुरू असून, येत्या १५ दिवसांत ती पूर्ण केली जातील, अशी हमी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी दिली. आम आदमी पक्षाने (आप) रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत सादर केलेल्या निवेदनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

विविध भागांतील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून 'आप'ने गेल्या काही दिवसांपासून आंदोलन छेडले आहे. मुख्य तसेच अंतर्गत मार्गांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्याचा फटका वाहनचालकांना बसत असून, त्यामुळे रस्ते अपघातही वाढत आहेत. राज्य सरकारने याची गंभीर दखल घेत रस्त्यांवरील खड्डे बुजवावे तसेच खराब झालेल्या रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी 'आप'कडून होत आहे.

यासंदर्भात 'आप'च्या नेत्यांनी राज्यभर सह्यांची मोहीमही राबवली होती. या मोहिमेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून सुमारे एक लाख नागरिकांनी आपापल्या भागातील रस्ते खराब असल्याची तक्रार केलेली आहे.

नागरिकांच्या रस्त्यांच्या तक्रारींची दखल घेत, खराब रस्त्यांची लवकरात लवकर डागडुजी करण्यात यावी तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत, अशी मागणी 'आप'ने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे केली. त्यावर राज्यातील सर्वच रस्त्यांची कामे येत्या चार दिवसांत सुरू करण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिली असल्याची माहिती 'आप'चे राज्य संयोजक अमित पालेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

रस्त्यांची कामे सुरु; मुख्यमंत्री

'आप'च्या नेत्यांनी मंत्रालयात येऊन आपल्याला खराब रस्त्यांसंदर्भात निवेदन सादर केलेले आहे. राज्यातील अनेक भागांतील रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत. पुढील १५ दिवसांत ती पूर्ण केली जातील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

राज्यातील खराब रस्त्यांबाबत 'आप'ने 'भाजपचे बुराक' आंदोलन छेडत, सहह्यांची मोहीम राबवली. या आंदोलनात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि गोव्याच्या प्रभारी आतिषी, राज्य संयोजक अमित पालेकर यांच्यासह पक्षाचे इतर सहभागी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

...अन् सर्वजण आकाशाकडेच पाहत राहिले! क्रिकेट सामन्यात पहिल्यांदाच घडलं असं काही; चाहत्यांनी पाहिला अद्भुत नजारा Watch Video

Ganesh Idol Sellers Registration: गणेशमूर्ती विक्रेत्यांना नोंदणीसाठी मुदतवाढ, पर्यावरण विभागाकडून संकेतस्थळ सुरू ठेवण्याचे निर्देश

Agniveer New Rules: अग्निवीरांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! वीरमरण आल्यास कुटुंबाला पेन्शन किंवा नोकरी देण्याची तयारी; लवकरच नियमात होणार बदल

Goa Karnataka Water Dispute: म्हादईनंतर आता तिळारीच्या पाण्यावरही कर्नाटकाची नजर; गोव्याच्या जलहक्कांसमोर नवे संकट, सत्ताधारी-विरोधक मात्र शांतच!

Delhi Red Fort Blast: दिल्ली बॉम्बस्फोटामागे 'अल-कायदा'! UNच्या अहवालातून मोठा खुलासा; 'जैश'चे नाव पुढे करुन खेळला खतरनाक खेळ

SCROLL FOR NEXT