Goa CM Pramod Sawant And Ministers In Maha Kumbh Mela 2025
उत्तर प्रदेश: प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ यात्रेत सहभागी होण्यासाठी देशातून भाविक गर्दी करतायेत. गोव्यातून एक ट्रेन प्रयागराजला जाऊन आल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल मंत्री आमदारांसह महाकुंभ यात्रेसाठी दाखल झाले आहेत. सावंत सरकारमधील सर्व आमदार शनिवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी सहकुटुंब दाबोळी विमानतळावर दाखल झाले होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंत्री माविन गुदिन्हो. आमदार कृष्णा साळकर, संकल्प आमोणकर यांच्यासह इतर आमदार व मंत्री प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. सर्वजण सहकुटुंब प्रयागराज येथील महाकुंभात सहभागी होऊन पवित्र स्नान करतील. यापूर्वी गोव्यातून प्रयागराजसाठी एक विशेष ट्रेन रवाना करण्यात आली होती. यातून अनेक भाविकांनी प्रयागराज येथे भेट देऊन पवित्र स्नान केले होते.
महाकुंभ यात्रेचा योग अनेक दिवसानंतर येत असतो, त्यामुळे या दुर्मिळ योगाचा अनुभव आणि अभुभूती घेण्यासाठी आम्ही जात आहोत, असे मत राज्यपाल पिल्लई यांनी व्यक्त केले. तर, महांकुभसाठी प्रयागराजला जाण्याचा योग आता आला आहे. गोमंतकीयांसाठी आणखी एक ट्रेन आयोजित करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. महाकुंभचे यशस्वी आयोजन केल्याबाबत मुख्यमंत्री योगींचे अभिनंदन केले.
प्रयागराज महाकुंभमध्ये 13 जानेवारीपासून आत्तापर्यंत 50 कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. दर 12 वर्षांनी होणारा कुंभमेळा हा हिंदू धर्मातील एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा धार्मिक उत्सव मानला जातो. यावेळी प्रयागराजमध्ये महाकुंभ आयोजित होत आहे.
13 जानेवारी 2025 पासून सुरू झालेल्या हा कुंभमेळा 26 फेब्रुवारी 2025 रोजी समाप्त होणार आहे. कुंभमेळा विशेषत: हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक या चार पवित्र ठिकाणी आयोजित केला जातो. या स्थानांना पवित्र मानले जाते कारण, जेव्हा देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले तेव्हा अमृताचे काही थेंब येथे पडले होते, अशी मान्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.