Goa CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

1972 पूर्वीची रस्त्यालगतची घरे, दुकाने कायदेशीर होणार; मुख्यमंत्री माझे घर योजनेचा अमित शहांच्या हस्ते शुभारंभ

Seva Pakhwada 2025: वनहक्क दाव्यांअंतर्गत मंजुरी मिळालेल्यांना तसेच जलसंपदा खात्यामार्फत ज्यांना जमिनी दिल्या आहेत, त्यांनाही संबंधित जमिनींची सनद वितरित करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: १९७२ पूर्वीच्या सर्वे आराखड्यात नोंद असलेली रस्त्यालगतची घरे, दुकाने आणि इतर आस्थापनेही 'माझे घर' योजनेअंतर्गत कायदेशीर होतील. ४ ऑक्टोबर रोजी ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर मैदानावर आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते या योजनेचा शुभारंभहोणार असल्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी दिली.

राज्य सरकारतर्फे आयोजित सेवा पखवाडा कार्यक्रमानिमित्त ते व्हच्र्युअल पद्धतीने जनतेशी संवाद साधत होते. राज्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य सरकारने राबवलेल्या "स्वयंपूर्ण गोवा" मोहिमेला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सरकारने १९७२ पूर्वी उभारलेल्या घरांसह सरकारी, खासगी, कोमुनिदाद जमिनींवरील घरे कायदेशीर करण्याचा निर्णय घेतला.

त्यासंदर्भातील विधेयके गत पावसाळी अधिवेशनात मंजूर झाल्यानंतर राज्यपालांनीही या विधेयकांनाही मान्यता दिली आहे. त्यानुसार संबंधित घरे कायदेशीर होणार आहेत. याशिवाय घर विभाजन आणि घर दुरुस्तीसाठीही तीन दिवसांत प्रमाणपत्रेही देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी सुरू केलेल्या "माझे घर" योजनेचा शुभारंभ येत्या ४ ऑक्टोबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे.

या योजनेअंतर्गत देण्यात देणाऱ्या अर्जाचे त्याच दिवसापासून वितरण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले. "माझे घर" योजनेअंतर्गत पुनर्वसन मंडळाने दिलेले फ्लॅटही तेथे राहणाऱ्यांच्या नावावर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार मुरगावातील सुमारे ३४० फ्लॅट संबंधितांच्या नावावर करण्यात येतील.

वनहक्क दाव्यांअंतर्गत मंजुरी मिळालेल्यांना तसेच जलसंपदा खात्यामार्फत ज्यांना जमिनी दिल्या आहेत, त्यांनाही संबंधित जमिनींची सनद वितरित करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

दिव्यांगांना पर्पल फेस्तचा लाभ मिळवून द्या!

समाज कल्याण खात्यामार्फत येत्या ९ ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्तला सुरुवात होणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून दिव्यांगांना आवश्यक त्या साधनसुविधा, वस्तू पुरविण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.

या महोत्सवाचा आपापल्या मतदारसंघातील दिव्यांगांना फायदा मिळवून देण्याची जबाबदारी आमदारांची असून, त्यांनी ती योग्य पद्धतीने पार पाडावी, असे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

2037 पर्यंत गोवा बनणार विकसित राज्य

गोवा पर्यटन राज्य असल्यामुळे स्वच्छ, सुंदर, नितळ गोव्यासाठी जनतेने राज्य सरकारला पूर्णतः सहकार्य करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. गोव्याला २०३७पर्यंत विकसित राज्य करण्याचे स्वप्न संघटित राहून पूर्ण करूया, अशी सादही त्यांनी यावेळी जनतेला घातली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Rajyog: "नशिबाची साथ अन् पैशांचा पाऊस!" नवपंचम राजयोग बदलणार 'या' 3 राशींचं भाग्य; करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार

Louis Berger Case: 'मी जेलमध्ये गेलो अन् खरे गुन्हेगार मंत्री झाले!' लुईस बर्जर प्रकरणी चर्चिल आलेमाव कडाडले; राजकीय सूडबुद्धीने गोवल्याचा केला गंभीर आरोप

गोव्याचा फिरकीपटू मोहित रेडकर बीसीसीआय शिबिरात, हरभजन सिंग देणार 'गुरुमंत्र'

Indian Super League 2026: एफसी गोवा कोलकात्यात पुन्हा वरचढ? ईस्ट बंगालविरुद्ध रंगणार आयएसएल फुटबॉल सामना

IND vs ENG Pitch Report: "वानखेडेची खेळपट्टी कोणाला साथ देणार?" ओपनर्सचा धमाका की स्विंगचा तडाखा; हाय-व्होल्टेज सेमीफायनलमध्ये टॉस ठरणार गेम चेंजर

SCROLL FOR NEXT