Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa CM Appeal to Doctors: डॉक्टर झाल्यानंतर परदेशात जाऊ नये; गोमंतकीयांची सेवा करावी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Goa News: राज्यात अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेतात मात्र डॉक्टर झाल्यानंतर परदेशात निघून जातात, यामुळे राज्यातील आरोग्य क्षेत्रात ताण निर्माण होतोय इंडियन मेडिकल असोसिएशनच्या फोंडा शाखेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते

गोमन्तक डिजिटल टीम

Indian Medical Association, Ponda Branch

फोंडा: राज्यात अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेतात मात्र डॉक्टर झाल्यानंतर परदेशात निघून जातात, यामुळे राज्यातील आरोग्य क्षेत्रात ताण निर्माण होतोय असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणालेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या फोंडा शाखेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्यातील लोकांच्या आरोग्याचा विचार करून गोवा मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी जागा वाढवण्यात आल्यात मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे विद्यार्थी परदेशात निघून जातात. परदेशात जरी चांगला मोबदला मिळत असला तरीही यांनी गोमंतकीयांची सेवा करण्यावर अधिक भर द्यावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

पूर्वी आपल्याकडे परिवाराचा केवळ एकच डॉक्टर असायचा मात्र आता अनेक हॉस्पिटल्सच्या बाहेर मोठाल्या रांगा लागलेल्या दिसतात, यामुळे डॉक्टर आणि रुग्णामध्ये जिव्हाळा निर्माण होऊ शकत नाही मात्र याला डॉक्टर जबाबदार नाहीत. डॉक्टरांना दर दिवशी जवळपास दीडशे लोकांना तपासावे लागते आणि म्हणूनच जिव्हाळा निर्माण होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.

आजार झाल्यानंतर त्यावर खर्च करण्यापेक्षा आजार कसा होणार नाही यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि यात सरकार मदतीसाठी नेहमीच हजर असेल असेही मुख्यमंत्री म्हणालेत. राज्यात सध्या डायलिसिसची चिंता भेडसावत आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात डायलिसिस युनिट असून देखील रुग्णांवर हवे तसे उपचार होत नाहीयेत, यावर आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी विचार करायला हवा असे त्यांचे म्हणणे आहे.

पॉलिटिव्ह क्षेत्रात इंडियन मेडिकल असोसिएशनचं फोंडा इथे सुरु असलेलं काम उत्तम असून सरकारच्या माध्यमातून त्यांना मी अनुदान मिळवून दिलं आहे आणि पुढे कोणत्याही मुख्यमंत्र्यांकडून हे अनुदान बंद होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या फोंडा शाखेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसोबत आयएमएचे अध्यक्ष आर.व्ही अशोकन, डॉ. दत्ताराम देसाई, डॉ. श्वेता खांडेपारकर, डॉ. सुरज काणेकर इत्यादी मंडळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT