Dr Pramod Sawant: हिंस्र कुत्र्यांवर आता गोव्यात बंदी - सावंत

Anjuna Pittbull Attack: हणजूण येथे कुत्र्याच्या हल्ल्यात एका लहान मुलाचा मृत्यू होणे ही मनाला वेदना देणारी घटना आहे.

गोव्यात हिंस्र कुत्रे पाळण्यास पूर्णपणे बंदी घातली जाणार आहे. असे कुत्रे गोव्यात आणूच नयेत यासाठी पशुवैद्य खात्याला सूचना दिली जाईल. तसेच सध्या ज्यांच्याकडे अशा प्रकारचे कुत्रे आहेत, त्यांच्याकडून जबाबदारीचे प्रतिज्ञापत्र घेतले जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोणाचाही कुत्रे पाळण्याचा छंद एखाद्या व्यक्तीचा जीव घेणारा ठरू नये, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. हणजूण येथे कुत्र्याच्या हल्ल्यात एका लहान मुलाचा मृत्यू होणे ही मनाला वेदना देणारी घटना आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

cm pramod sawant
Goa Politics
Valpoi Stray Dogs Survey
Konkani Essay Book Launch
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com