Goa CM Dr. Pramod Sawant In karnataka Election campaigning Dainik Gomantak
गोवा

karnataka Election : ग्रामीण कर्नाटकचा विकास भाजपच करू शकतो : मुख्यमंत्री डॉ. सावंत

कर्नाटक विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात

दैनिक गोमन्तक डिजिटल

ग्रामीण कर्नाटकाच्या विकासासाठी डबल इंजिनच्या सरकारची आवश्यकता असून भाजपच या भागाचा विकास करू शकेल, असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले आहे.

कर्नाटकातील खानापूर मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रचारानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कर्नाटक विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून विविध राजकीय पक्षांच्या प्रचाराने वेग घेतला आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पत्नी आणि महिला मोर्चाच्या प्रभारी सुलक्षणा सावंत यांनी बेळगाव जिल्ह्यातील खानापूरचे भाजपचे अधिकृत उमेदवार विठ्ठल हलगेकर, बेळगाव उत्तरचे उमेदवार रवी पाटील यांच्यासाठी सक्रिय प्रचार करत आहेत. आज त्यांनी ठिकठिकाणी कोपरा सभा आणि रॅली केल्या.

यावेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले, की कर्नाटकाच्या विकासामध्ये भाजपची भूमिका महत्त्वाची आहे. कोणत्याही प्रदेशाच्या विकासासाठी डबल इंजिनचे सरकार महत्त्वाचे असून केंद्र सरकार त्यांची जबाबदारी पार पाडत आहे.

केंद्राप्रमाणे कर्नाटकातही भाजपचे सरकार येणे गरजेचे आहे. याकरता आपण भाजपच्या अधिकृत उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे. बेळगावसह सीमा भागातील अनेक गावातील तरुण रोजगाराच्या निमित्ताने गोव्यात आहेत. त्यांनाही विनंती आहे की त्यांनी भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT