Goa CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: गोव्याचे CM प्रमोद सावंत यांच्याही बॅगा तपासल्या; कराड विमानतळावर झाले चेकिंग Viral Video

Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्रात बॅग तपासणीवरुन वाद होत असताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची देखील बॅग तपासण्यात आली.

Pramod Yadav

कराड: महाराष्ट्र विधानसभेसाठी येत्या २० तारखेला मतदान होत असून, राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. विविध मतदारसंघात विविध पक्षाचे नेते प्रचारासाठी हजेरी लावत आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी गोव्यातून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह नेत्यांची फौज महाराष्ट्रात प्रचार करत आहे.

मुख्यमंत्री सावंत बुधवारी सातारा जिल्ह्यातील कराड मतदारसंघात सभेसाठी आले असता विमानतळावर त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कराड दक्षिण आणि कराड उत्तरचे भाजप महायुतीचे उमेदवार अनुक्रमे मनोज घोरपडे आणि अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेसाठी हजेरी लावली.

मुख्यमंत्री कराड विमानतळावर दाखल होताच त्यांच्यासोबत असलेल्या बॅगा आणि साहित्याची निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. सावंत यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली त्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

महायुती सरकारने टेंभु, म्हैसाळसारख्या योजनांना मोठ्या प्रमाणावर निधी देऊन या भागाचा दुष्काळी चेहरा बदलण्याचे काम केले. कराडच्या विकासासाठी महायुती कटिबद्ध असल्याचा दावा मुख्यमंत्री सावंत यावेळी भाषणात केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे आयुषमान भारत योजना लागू केली, असेही सावंत यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री आणि कराड उत्तरचे विद्यामान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर देखील टीका केली. काँग्रेसचे सध्याचे आमदार विकास करण्यासाठी समर्थ नाहीत. त्यांच्याकडे विकासकामे दाखविण्यासाठी एकही प्रकल्प नाही. त्यामुळे जनता यावेळी त्यांना घरी बसवेल, अशी टीका सावंत यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता केली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री सावंत या निवडणुकीत स्टार प्रचारक राज्यात सर्वत्र फिरत आहेत. कराडमध्ये सभा घेण्यापूर्वी सावंत यांनी सांगलीत दोन सभांना संबोधित केले.

कडेगाव येथे पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघासाठी भाजप महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख आणि जत विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचार सभेत हजेरी लावली.

बॅग तपसाणीवर महाराष्ट्रात वाद

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात निवडणूक आयोगाच्या वतीने विविध नेत्यांच्या बॅगा तपासल्या जात आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यासह विविध प्रचारासाठी जाणाऱ्या विविध नेत्यांच्या बॅगा तपासल्या जात आहेत.

उद्धव ठाकरे यांची सलग दोनवेळा बॅग तपासणी झाल्यानंतर त्यांचा संताप झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना अपॉईंमेंट लेटर मागणाऱ्या उद्धव ठाकरेंना प्रचार बंदी घाला, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT