CM Sawant On Aadhaar-PAN link
CM Sawant On Aadhaar-PAN link  Dainik Gomantak
गोवा

Aadhaar-PAN link : गोयकारांनो आधार-पॅन कार्ड लिंक करा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rajat Sawant

लवकरात लवकर आधार-पॅन कार्ड लिंक करुन घ्यावे असे आवाहन आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील जनतेला केले. जनतेने गोंधळून जाण्याचे काहीही कारण नाही. 31 मार्च 2023 पर्यंत आधार-पॅन कार्ड लिंक करु शकता असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

याबाबतचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करीत मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "31 मार्च 2022 पर्यंत आधार-पॅन कार्ड लिंक करुन घेण्याची केंद्र सरकारच्या वित्त विभागाची आर्डर होती. कोरोनाच्या कार्यकाळात केंद्र सरकारने हे 31 मार्च 2023 पर्यंत 1 हजार रुपयांचा दंड भरुन लिंक करुन घेण्यास कळवले."

"आपले आधार-पॅन कार्ड लिंक 31 मार्च 2023 पर्यंत 1 हजार रुपयांचा दंड भरुन करु शकता. हे तुम्ही स्वत: वित्त विभागाच्या वेबसाईटला भेट देवून करु शकता किंवा सीए, टॅक्स ऑडिटर, सिटीझन सर्विस सेंटर येथे करु शकता."

"1 हजार रुपयांचा दंडाव्यतिरिक्त यासाठी किमान फी आकारु शकतात मात्र त्यापेक्षा अधिक आकारल्यास हा गुन्हा आहे. लवकरात लवकर गोव्यातील जनतेने गोंधळून न जाता आधार-पॅन कार्ड लिंक करुन घ्यावे" असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: भारतीय नौदलाच्या विमानाचे दाबोळीवर आपत्कालीन लँडिंग, चार फ्लाईट्स वळवल्या

Pernem News : पेडणे तालुक्यातील रस्त्यांची ‘वाट’; रस्ते पावसाळ्यापूर्वी तरी दुरुस्त होतील का

Goa Today's Live News: मडगाव येथे अपघातात एक ठार, एक जखमी

Bicholim Volleyball League : सर्वण येथे व्हॉलिबॉल लीगला सुरवात; आठ संघांचा सहभाग

Goa Traffic Violations: वाहतूक उल्लंघन ; चार महिन्यांत ९ कोटींचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT