CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: पत्रकाराचा अचंबित करणारा प्रश्न आणि मुख्यमंत्र्यांचे खुमासदार उत्तर, म्हणाले, आम्ही लवकरच राज्यात..

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला

Ganeshprasad Gogate

CM Pramod Sawant देशात होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली असून सध्या गोव्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्यासह प्रदेशाध्यक्ष देशातल्या निरनिराळ्या भागात पक्ष बांधणीच्या उद्देशाने दौरे करत आहेत.

भाजप हा राष्ट्रीय पक्ष असल्याने निवडणूक असलेल्या राज्यात नेते, आमदार, कार्यकर्ते संघटनात्मक कामासाठी जात असून सध्या राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत छत्तीसगडमध्ये पक्षाच्या कामासाठी गेले आहेत.

छत्तीसगडमध्ये या अगोदर काँग्रेसने सरकार स्थापन केले होते. त्यावेळी काँग्रेसने प्रचारादरम्यान दारूबंदीच्या मुद्द्यावर जनतेचा विश्वास संपादन करत सत्ता स्थापन केली होती.

सध्या छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजप पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असून गोव्याचे मुख्यमंत्री तेथील उमेदवाराचं पारडं जड होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत.

याच दरम्यान त्यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांवर अचंबित होण्याची वेळ आली.

थोडक्यात घडलं असं की, पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने प्रमोद सावंत यांना विचारले की, ''छत्तीसगडचे सध्याचे काँग्रेसचे सरकार राज्यात दारूबंदीच्या आश्वासनामुळे जिंकून आले होते. निवडणुकीत दारूबंदी हा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. याच पार्श्वभूमीवर तुम्ही देखील दारूबंदी करणार का’? हा प्रश्न ऐकून मुख्यमंत्री डॉ. सावंत अचंबित झाले.

ते म्हणाले, ‘भाईसाहब, गोवा एक टुरिस्टिक स्टेट है’. यावर तो पत्रकार लगेच म्हणाला, ‘मी गोव्याविषयी नाही तर छत्तीसगडविषयी बोलत आहे.’ पत्रकाराच्या या विधानावर मुख्यमंत्र्यांना हसू आवारणे कठीण झाले. पण खुमासदार उत्तर देत सावंत म्हणाले, ‘आम्ही लवकरच छत्तीसगडचे घोषणापत्र जारी करू’.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT