Cruz Silva  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: ‘एमडीआर-४२’बाबत प्रक्रिया सुरू; सिल्वा यांच्या सूचनेला मुख्यमंत्र्यांचे उत्तर

Goa Main District Road: हा रस्ता ८ फेब्रुवारी १९७७ साली एमडीआर-४२ म्हणून अधिसूचित केला होता

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: चिंचणी येथील येथील रस्त्याचा मुख्य जिल्हा मार्ग-४२चा (एमडीआर-४२) दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची प्रक्रिया सुरू आहे, असे उत्तर आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार क्रुझ सिल्वा यांच्या लक्षवेधी सूचनेला विधानसभेत शून्य तासावेळी दिले.

एमडीआर-४२ हा रस्ता चिंचणी गावातून जाऊन माकाझान गावात संपतो. हा रस्ता ८ फेब्रुवारी १९७७ साली एमडीआर-४२ म्हणून अधिसूचित केला होता. एमडीआर-४३ रस्ता जो दाबोळी-केळशीपर्यंत जातो तो १९७७ साली अधिसूचित केला होता, तो पूर्णपणे वेगळा आहे.

रघुवीर गिरण, देवसू चिंचणी ते राष्ट्रीय महामार्ग ६६, दांडेवाडा जंक्शन व्हाया सेंट मेरी कॉन्व्हेंट हायस्कूल, सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील १.६ किलोमीटरचा रस्त्याचा एमडीआर दर्जा रद्द करण्याच्या विचारात नाही, त्यामुळे चिंचणीच्या रहिवशांनी चिंता करण्याची गरज नाही, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT