Electric Vehicles For Tourist in Goa From Next Year Dainik Gomantak
गोवा

Goa G20 Meeting: गोव्यात यापुढे पर्यटकांसाठी केवळ इलेक्ट्रिक वाहनेच; पुढील वर्षापासून अंमलबजावणी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

Akshay Nirmale

Electric Vehicles For Tourist in Goa From Next Year: गोव्यात पुढील वर्षापासून पर्यटकांसाठी रेंटवर देण्यात येणारी वाहने केवळ इलेक्ट्रिकच असतील, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी केली. पुढील वर्षी जानेवारीपासून याची अंमलबजावणी केली जाईल.

गोव्यातील सर्व नवीन पर्यटक वाहने जानेवारीपासून इलेक्ट्रिक होतील. यामध्ये कॅब सर्व्हिस वाहने आणि मोटारसायकल (दुचाकीं) चाही समावेश असणार आहे.

पणजी येथे भारताच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या G20 च्या चौथ्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या बैठकीच्या निमित्ताने NITI आयोगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना सावंत यांनी ही माहिती दिली.

या कार्यक्रमात भारताचे G20 शेर्पा अमिताभ कांत देखील सहभागी झाले होते. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी सांगितले की, गोवा सरकारने किनारपट्टीच्या राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना (EVs) प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत.

पुढील वर्षी जानेवारीपासून राज्यात भाड्याने मिळणारी सर्व नवीन पर्यटक वाहने इलेक्ट्रिक असतील. यामध्ये कॅब सर्व्हिस वाहने आणि मोटारसायकलचाही समावेश आहे.

सावंत म्हणाले की, पुढील वर्षी जानेवारीपासून सर्व नवीन पर्यटक वाहने, भाड्याने घेतलेली कॅब आणि मोटारसायकल अनिवार्यपणे इलेक्ट्रिक असतील. जानेवारी 2024 पासून सरकारला देखील वाहन खरेदीत इलेक्ट्रिक वाहन खरेदीची सक्ती करण्यता आली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यातील दरडोई वाहन मालकी राष्ट्रीय सरासरीच्या 4.5 पट आहे. राज्यांनी खरेदी केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) यादीत गोवा चौथ्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT