Exercise on Climate disasters in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Climate Disasters Exercise: गोव्यात हवामानविषयक आपत्तींबाबत 9 ऑक्टोबरपासून सराव; 8 देशांचा सहभाग

एनडीआरएफ, तटरक्षक दल यांसह विविध एजन्सी 3 दिवसीय सरावात सहभागी होणार

Akshay Nirmale

Exercise on Climate disasters in Goa: गोव्यात 3 दिवसीय वार्षिक संयुक्त ह्युमनेटेरियन असिस्टन्स अँड डिझास्टर रिलिफ (HADR) सराव कार्यक्रमात सोमवारी, 9 ऑक्टोबरपासून सुरवात होत आहे.

या उपक्रमात हिंदी महासागर क्षेत्रातील 8 देश सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी दिलेल्या निर्देशांनुसार हा कार्यक्रम होत आहे. या वर्षी हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या आपत्तींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

या सरावामध्ये भारतीय तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM) आणि तिरंगी सेवांसह नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी या सरावात सहभागी होणार आहेत.

नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी समनव्य, प्रभावी प्रतिसाद यंत्रणा विकसित करणे याबाबत या सरावातून मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षा आहे.

हवामान बदलामुळे मानवासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ते झपाट्याने वाढतही चालले आहे. या धोक्याला तोंड देण्यासाठी हिंदी महासागर क्षेत्रातील देशांनी एकत्र आल्यास त्याचा लाभ होऊ शकतो.

सर्व देशांच्या मर्यादित क्षमतेत त्यामुळे वाढ होऊ शकते, असे वरिष्ठ नौदल नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारत स्वतःला हिंदी महासागर क्षेत्रातील प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून स्थान देत आहे. संयुक्त HADR सरावामुळे नैसर्गिक आपत्तींना एकसंध आणि जलद प्रतिसाद देण्याची क्षमता तयार होईल, अशी आशा आहे. सैन्याची तिन्हे दले आपत्तीच्या प्रसंगी मदत पुरवत असतात.

या सरावअभ्यासामुळे अशा दुर्दैवी घटनांसाठी तत्पर राहण्याची आमची तयारी आणखी वाढेल.

भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायुसेनेद्वारे संयुक्त सराव रोटेशनमध्ये आयोजित केला जातो. गतवेळी आग्रा येथे भारतीय हवाई दलाने या सरावाचे आयोजन केले होते. यावर्षी, नौदलाने आयएनएस हंसा येथे सरावाचे आयोजन केले आहे.

विविध एजन्सींच्या तज्ज्ञांद्वारे हवामान बदल, नैसर्गिक आपत्तीची जोखीम कमी करणे, आपत्ती प्रतिसाद आणि ज्ञानाची देवाणघेवाण यावर चर्चा या होईल. बुधवारी प्रात्यक्षिक आयोजित केले जाईल, तसेच कवायत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colavale Jail Brawl: कोलवाळ जेलमध्ये राडा; 8 ते 10 कैद्यांकडून अंडर ट्रायल कैद्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण

Viral Video: रेल्वे स्टेशनवर 'बेल्ट वॉर'! वंदे भारतमधील IRCTC कर्मचाऱ्यांची तुंबळ हाणामारी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs AUS 3rd ODI: सिडनी वनडेत कोणाला संधी, कोणाला डच्चू? मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार मोठे बदल

माजी खाणपट्टाधारकांना खनिज विक्रीस परवानगी; गोवा सरकारचा डंप पॉलिसीअंतर्गत महत्वाचा निर्णय

सात दिवसानंतर चौथा बळी; रासई लोटली स्फोटात जखमी बिहारच्या कामागाराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT