Goa Textbook Shortage Dainik Gomantak
गोवा

Textbook Shortage: उन्हाळी सत्र संपत आलं; मराठी पुस्तकाचा पत्ता नाही, नववीच्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय; हिंदीचे पुस्तकही 15 दिवस उशिराने उपलब्ध

Goa Textbook Shortage: इयत्ता नववीच्या मराठी विषयाचे पुस्तक अद्याप बाजारात उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात नव्या नियमानुसार १ एप्रिलपासून शाळा सुरू झाल्या असल्या तरी इयत्ता नववीच्या मराठी विषयाचे पुस्तक अद्याप बाजारात उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. हिंदी विषयाचे पुस्तकही सुमारे १५ दिवस उशिराने उपलब्ध झाले, तर मराठीचे पुस्तक अजूनही उपलब्ध झालेले नाही.

शिक्षकांकडून ‘पुस्तक आणा’ अशा सतत सूचना दिल्या जात असताना विद्यार्थ्यांना पुस्तकाविना अभ्यास करावा लागत आहे. विशेष म्हणजे, शाळांना सुट्टी लागण्यास आता काहीच दिवस उरले असूनही मराठीचे पुस्तक उपलब्ध नसल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या संदर्भात पणजीतील सरदेसाई बुक स्टॉलच्या मालकांनी सांगितले की, दररोज पालक नववीच्या मराठी पुस्तकाविषयी विचारणा करीत आहेत. संबंधित प्रिंटिंग प्रेसकडून पुढील आठवड्यात पुस्तके उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले आहे.

पुस्तक येताच पालकांना कळवण्यासाठी त्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले.एका पुस्तक विक्रेत्याने सांगितले की, अभ्यासक्रम बदललेला असो किंवा नसो, पुस्तक छपाईची ऑर्डर संबंधित प्रिंटिंग प्रेसकडे वेळेत पोहोचत नाही, हीच मुख्य समस्या आहे. पुस्तके वेळेत उपलब्ध व्हावीत, यासाठी अभ्यास क्रम आणि छपाईची प्रक्रिया उन्हाळी सुटीपूर्वीच पूर्ण करणे आवश्यक आहे.

मोबाईलवरून धडे मागवण्याची वेळ

पुस्तक उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थी आपल्या सहाध्यायांकडून मोबाईलवर धड्यांची छायाचित्रे मागवून अभ्यास करत आहेत. डिजिटल माध्यमांवर अवलंबून राहण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली असून ही परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे.

शासनाचा खर्च वाया

पाचवीसाठी यंदा हिंदी विषयच नाही. तरीही शिक्षण विभागाने हिंदीची पुस्तके मागवून काही शाळांत वाटली. विषय नसल्याचे लक्षात आल्यानंतर ही मोफत पाठ्यपुस्तके परत करण्याचा आदेश सर्व शिक्षा अभियानाने दिला आहे. धोरणानुसार, पाचवीत हिंदीचा समावेश नाही. सुमारे ३० हजारांहून अधिक पुस्तके वितरित झाल्याने शासनाचा खर्च वाया गेला. यासाठी जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT