PM Modi Goa Dainik Gomantak
गोवा

"3 वाजल्यापासून बसलो, पण..." प्रधानमंत्री मोदीक पळोंवक मेळूंक ना म्हूण 'भाऊ' बेजार; Watch Video

Gokarna Partagal Math: पंतप्रधानांच्या या महत्त्वाच्या सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या अनेक नागरिकांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण पसरले आहे

Akshata Chhatre

Gokarna Partagal Math Ram statue: गोव्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७७ फुटी भव्य श्रीरामांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यासाठी गोव्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पंतप्रधानांच्या या महत्त्वाच्या सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या अनेक नागरिकांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण पसरले आहे.

मोदींच्या भेटीसाठी आलेले नागरिक नाराज

पंतप्रधानांच्या या महत्त्वाच्या सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या अनेक नागरिकांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण पसरले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, सुरक्षा व्यवस्थेमुळे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना जवळून पाहता आले नाही. केवळ ७७ फुटी श्रीरामांच्या मूर्तीचे अनावरण पाहण्यासाठीच नव्हे, तर पंतप्रधानांना पाहण्याच्या उद्देशानेही अनेक लोक दूर-दूरवरून आले होते.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी गोव्याच्या संस्कृती आणि मठाच्या योगदानाचे तोंडभरून कौतुक केले. 'पोर्तुगीजांच्या अनेक आक्रमणांमुळे गोव्याची मंदिरे, संस्कृती आणि भाषेवर वारंवार संकटे आली. मात्र, या संकटांना न जुमानता गोमंतकीयांनी आपली मूळ संस्कृती टिकवून ठेवली, यात पर्तगाळ मठाचाही मोठा वाटा आहे. हा मठ समाज जोडणारे ऊर्जा केंद्र आहे,' असे गौरवौद्गार मोदींनी काढले.

'३ वाजल्यापासून बसलो, भेटलेच नाहीत!'

या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एका वयस्कर नागरिकाने आपला रोष व्यक्त करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'आम्ही सांगे येथून केवळ मोदींना पाहण्यासाठी आलो होतो.

पासवर दिलेल्या वेळेनुसार आम्ही ३ वाजल्यापासून येऊन बसलो, पण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आम्हाला आत सोडले नाही,' अशी व्यथा त्यांनी व्हिडिओमध्ये मांडली आहे. 'मोदी कार्यक्रम संपवून निघून गेल्यावर आत जा,' असे त्यांना सांगण्यात आले. यासाठी एवढ्या लांबून आलो, पण पंतप्रधान भेटलेच नाहीत, यामुळे ते ज्येष्ठ नागरिक अत्यंत नाराज झालेले दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेह पेटीत जाळला, राख नदीत फेकली; हत्येच्या 8 दिवसांनंतर सत्य आलं समोर

Casaulim: ..आणखीन एक खळबळजनक घटना! शेतात आढळली मानवी कवटी; कासावली परिसरात भीतीचे वातावरण

Goa Drowning Death: 96 जण समुद्रात बुडाले, 2654 जणांना जीवनदान; गोव्यात 5 वर्षात झालेल्या दुर्घटनांचा Report

Goa Latest Updates: रेल्वे रुळावर महिलेचा मृतदेह आढळला

VIDEO: साळगावमध्ये 'रेंट-ए-बाईक' वादातून राडा, टोळक्याकडून पिता-पुत्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण; जीवे मारण्याची दिली धमकी

SCROLL FOR NEXT