Para-athlete Sakshi Kale | Goa News
गोवा

Sports: अभिमानास्पद ! अंधत्‍वाला मागे सारून तिस्क-उसगाव येथील पॅरा-ॲथलिट साक्षीची 'रौप्य' पदकाला गवसणी

तिस्क-उसगाव येथील पॅरा-ॲथलिट साक्षी काळे हिने राष्ट्रीय पातळीवरील 19 वर्षांखालील पॅरा ॲथलेटिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली.

दैनिक गोमन्तक

Goa News: तिस्क-उसगाव येथील पॅरा-ॲथलिट साक्षी काळे हिने प्रबळ जिद्दीच्या बळावर आणि दुखापत वाढण्याची भीती असूनही अतुलनीय धैर्य दाखवत राष्ट्रीय पातळीवरील 19 वर्षांखालील पॅरा ॲथलेटिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. ती टी-12 प्रकारातील अंध क्रीडापटू आहे.

गतवर्षी जूनमध्ये उसगाव येथे मुलांसमवेत फुटबॉल खेळत असताना साक्षी दुखापतग्रस्त झाली. तिच्या गुडघ्याला इजा झाली. ऑगस्टमध्ये गुडघ्यावर शस्त्रक्रिया करणे भाग पडले. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार सहा ते सात महिन्यांच्या विश्रांतीची आवश्यकता होती.

27 ते 29 जानेवारी या कालावधीत गुजरातमधील नादियाड येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत ती सहभागी झाली. 100 मीटर, गोळाफेक व लांबऊडीत ती सहभागी झाली. त्यापैकी 100 मीटर शर्यतीत तिला रौप्यपदक मिळाले. लांबऊडीत ती एकटीच स्पर्धक असल्याने तिला पदक देण्यात आले नाही.

वाटचालीत मदतीचा हात

गुजरातमधील ज्युनियर पॅरा ॲथलिट स्पर्धेत पदक जिंकण्याच्या वाटचालीत साक्षीला मदतीचा हात लाभला, त्याबद्दल आभार मानताना तिने सांगितले, की ‘खांडेपारचे पंचसदस्य मनीष नाईक यांनी तिकिटांची व्यवस्था केली.

सिद्धार्थ वाडेकर, नागेश पुजारी, योगेश रायकर यांनी ॲथलेटिक साहित्य उपलब्ध करून दिले. फिलोमेनो कॉस्ता, अर्जुन गावकर, पीटर डिसिल्वा, वामन गावडे, गिरिजादेवी देसाई यांनीही आर्थिकदृष्ट्या पाठबळ दिले.

शंभर टक्के तंदुरुस्त नव्हते. तरीही मी धोका पत्करला. शस्त्रक्रिया होऊन साडेचार महिने उलटले होते आणि गुडघाही दुखत नव्हता. माझा मित्र व फुटबॉलपटू अथर्व देसाई याचे मला तंदुरुस्तीविषयक बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. - साक्षी काळे, गोव्याची पॅरा-ॲथलिट

साक्षी 18 वर्षांची आहे. गतवर्षी मार्चमध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय सीनियर पॅरा ॲथलेटिक स्पर्धेत लांबऊडीत तिने सुवर्ण पटकावले. 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते.

ती फर्मागुढी-फोंडा येथील ‘जीव्हीएम’ ‘एसएनजेए’ उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीत शिकते. वडील ईश्वर काळे व आई मिलन यांनी सुरवातीपासूनच साक्षीला प्रोत्साहन देत तिचे मनोबल उंचावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

Mhadei River: ‘पिण्यासाठी पाणी’ हे कर्नाटकचे नाटक! ‘म्हादई’ तिन्ही राज्यांसाठी महत्त्वाची; कॅप्टन धोंड यांचे प्रतिपादन

School Bag Weight: ..विद्यार्थ्यांचा खांद्यावर दप्तराचे 'वाढते' ओझे! केंद्राच्‍या निर्णयाकडे गोव्याची पाठ; परिपत्रकाला ‘केराची टोपली’

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

SCROLL FOR NEXT