Goa News: 26 वर्षे सफाई काम केलेल्या 'त्या' वृद्ध महिलेला 5 लाख भरपाई द्या, गोवा सरकारला न्यायालयाने खडसावले

मूलभूत हक्क उल्लंघनप्रकरणी खंडपीठाचा सरकारला आदेश
Court |Goa News
Court |Goa NewsDainik Gomantak

Goa Government: पणजीतील व्यावसायिक कर खात्यात सफाई कामगार म्हणून गेली 26 वर्षे रोजंदारीवर काम केलेल्या वृद्धेच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिला पाच लाखांची भरपाई दोन महिन्यांत द्यावी.

ही भरपाई मुदतीनंतर दिल्यास ती 7 टक्के व्याजाने द्यावी लागेल, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले आहेत.

दवर्ली-नावेली येथील ज्योकिना गोम्स ई कुलासो (64) यांनी खंडपीठात याचिका सादर केली होती. तिला 63व्या वर्षी खात्याने रोजंदारी कामावरून कमी केले होते.

सेवा नियमित करून तिला निवृत्तिवेतन तसेच भरपाई देण्याची विनंती याचिकेत करण्‍यात आली होती.

  • ज्योकिना कुलासो हिने 2022 मध्ये नव्याने याचिका सादर केली. त्यावरील सुनावणीवेळी, याचिकादार महिला खात्यामध्ये काम करत असताना तिला वेतन दिले जात होते.

Court |Goa News
Union Budget 2023: अर्थसंकल्पात गोव्याला ठेंगा मात्र कर्नाटकला...
  • खात्याने किमान वेतन न देता कायद्याचे उल्लंघन केले आहे. . त्यामुळे तिला सेवेत नियमित करता येत नसल्यास देण्यात आलेले वेतन कायद्यानुसार नसल्याने सरकारने भरपाई द्यायला हवी.

  • तिला आलेल्या कमी वेतनाची रक्कम पाहता तसेच तिने केलेली सेवा पाहता किमान 5 लाख रुपये तरी सरकारने भरपाई म्हणून तिला देणे योग्य ठरेल., असे न्यायालयाने म्‍हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com