Freedom 4.0 Dainik Gomantak
गोवा

Freedom 4.0: 'Gen Z'ला जोडण्यासाठी चर्चचा नवा प्रयोग; पारंपरिक खेळ, संगीतातून साधणार संवाद

Goa Religious Institutions Youth Engagement: जगभरात ‘जेन झी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नव्या पिढीचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांकडून नव्या पद्धतींचा अवलंब केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: जगभरात ‘जेन झी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नव्या पिढीचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांकडून नव्या पद्धतींचा अवलंब केला जात असताना गोव्यातील चर्चनेही युवा वर्गाशी नाते अधिक दृढ करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

तिळामळ येथील कॅथलिक चर्चने स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘फ्रीडम ४.०’ या उपक्रमातून युवकांना केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता पारंपरिक खेळ, संगीत, खाद्यसंस्कृती आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

१५ ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमाला गोवा आणि दमणच्या आर्चडायोसिसचे सहाय्यक बिशप सिमांव फर्नांडिस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी युवकांना उद्देशून, ‘तुम्हीच आमचे भविष्य आहात. चर्चचे भविष्य तुमच्यावर अवलंबून आहे,’ असे सांगत चर्चच्या उपक्रमांमध्ये तरुणांनी अधिक सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. समाजात फूट पाडणारा द्वेष, मत्सर, राग आणि अप्रामाणिकपणा यापासून मुक्त होणे हीच खरी स्वातंत्र्याची भावना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘फ्रीडम’ उपक्रमाची सुरुवात २०२३ मध्ये झाली. मोबाईल फोन, ऑनलाइन खेळ आणि बदलत्या जीवनशैलीमुळे पारंपरिक मैदानी खेळ तसेच शेजारपाजारातील सामुदायिक मेळावे कमी होत असल्याची जाणीव झाल्यानंतर हा उपक्रम सुरू करण्यात आला. त्यातून केवळ मनोरंजन नव्हे, तर विविध पिढ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

डिजिटल जगाचे आकर्षण!

‘जेन झी’च्या पिढीसमोर डिजिटल जगाचे प्रचंड आकर्षण आहे. मोबाईल आणि ऑनलाइन जगामुळे प्रत्यक्ष भेटीगाठी, मैदानी खेळ आणि सामुदायिक संवाद कमी होत असताना चर्चचा उपक्रम हा त्याला पर्याय देण्याचा प्रयत्न मानला जात आहे. विशेष म्हणजे युवकांना केवळ कार्यक्रमाचे प्रेक्षक न ठेवता आयोजनातही सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यामुळे धार्मिक संस्थांमध्ये तरुणांची भूमिका नेमकी काय असावी, या प्रश्नाला या उपक्रमातून व्यवहार्य उत्तर देण्याचा प्रयत्न दिसतो.

जगभरातील धार्मिक संस्था नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी कोणती भाषा, कोणते माध्यम आणि कोणते उपक्रम प्रभावी ठरतील याचा विचार करीत असताना तिळामळ येथील ‘फ्रीडम ४.०’ हा गोव्यातील एक वेगळा प्रयोग ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT