Goa Corona Update | Pramod Sawant | Goa Christmas Festival in COVID Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: खुशखबर! नाताळ अन् थर्टी फर्स्ट धुमधडाक्यात होणार; कोरोना निर्बंधावर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Goa Corona Update: गोव्यात सध्या फेस्टिवल हंगाम सुरु होणार असल्यामुळे 2 जानेवारीपर्यंत कोणत्याच स्वरुपाचे निर्बंध लावण्यात येणार नाहीत.

दैनिक गोमन्तक

Goa Corona Update: गोव्यात सध्या राज्यात फेस्टिवल हंगाम आहे. त्यामुळे 2 जानेवारीपर्यंत कोणत्याच स्वरूपाचे निर्बंध लावण्यात येणार नाहीत. मात्र, या दरम्यानही कोरोनाचे रुग्ण वाढल्या तरीही त्या हाताळण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. कोरोनाच्या बीएफ-7 या नव्या व्हेरिएंटचा प्रसार झपाट्याने सुरू झाल्याने राज्य सरकारनेही सतर्कतेच्या उपाययोजनेला सुरवात केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी संपूर्ण आरोग्य यंत्रणेसह कोरोना तज्ज्ञ कमिटी आणि कृती दलाच्या काही सदस्यांबरोबर बैठक घेत एकूणच कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. प्रामुख्याने चीन, कोरिया, जपान, ब्राझील, अमेरिका येथे कोरोनाच्या बीएफ-7 या व्हेरिएंटचा प्रसार वाढत आहे.

दरम्यान, तेथील अनेक नागरिकांना रुग्णालयात भरती करण्यात येत आहे. त्यामुळे केंद्राच्या सूचनेवरून राज्य सरकारने संपूर्ण आरोग्य यंत्रणेला सतर्क केले असून कोरोनाची संबंधीचे प्रोटोकॉल पाळण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी देशभरात कोरोना उपचारासाठी उभारण्यात आलेली केंद्रे, ऑक्सिजन प्रकल्प, व्हेंटिलेटर यंत्रणा आणि मनुष्यबळाची रंगीत तालीम (मॉक ड्रील) घेण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी आज सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्यमंत्र्यांशी व्हर्च्युअल संवाद साधत तयारीचा आढावा घेतला. त्या अनुषंगाने गोव्यात देखील आरोग्य यंत्रणेचे मॉक ड्रील होणार आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.

चिंता नको.. खबरदारी घ्या!

हैदराबाद ः सध्या चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या ‘बीएफ.7’ या ओमिक्रॉनच्या उप-व्हेरिएंटची भारताला चिंता करण्याचे काही कारण नसल्याचे ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ जेनेटिक्स अँड सोसायटी’चे (टीआयजीएस) संचालक राकेश मिश्रा यांनी सांगितले.

लोकांनी मास्क घालण्याबरोबरच अनावश्यक गर्दी करणे मात्र टाळावे अशी सूचना त्यांनी केली आहे. आता बहुसंख्य भारतीयांमध्ये हायब्रीड इम्युनिटी तयार झाली असून ती लसीकरणामुळे आली आहे. याआधी भारतामध्ये ओमिक्रॉनमुळे जेव्हा मोठी लाट आली होती तेव्हा देखील लोकांचे रुग्णालयांत दाखल होण्याचे प्रमाण खूप कमी होते असे त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची

दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या 2 टक्के प्रवाशांची रँडम आणि लक्षण असणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. परदेशी प्रवास करणाऱ्यांकरिता कोविड चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. याशिवाय विमानतळांवर कोरोना संबंधीच्या आदर्श कार्यप्रणालीची अंमलबजावणी केली जात आहे.

नाकावाटे घ्यायची लस ‘को-विन’वर

भारत बायोटेकने विकसित केलेल्या नाकावाटे घ्यायच्या कोरोनाप्रतिबंधक लशीच्या वापराला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.ही लस ‘को-विन’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध होईल. राष्ट्रीय कोरोना प्रतिबंधक मोहिमेमध्ये देखील तिचा समावेश केला जाणार आहे. ‘बीबीव्ही-154’ असे या नाकावाटे घ्यायच्या लशीचे नाव असून देशाच्या औषध नियंत्रकांनी नोव्हेंबरमध्ये तिला मान्यता दिली होती.

नवा व्हेरिएंट बीएफ-7 च्या पार्श्वभूमीवर केंद्राचे राज्यांना निर्देश

  • चाचण्या, उपचार, रुग्णांचा शोध या रणनीतीवर भर द्या

  • सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक डोस दिला जावा

  • लोकांना मास्क घालण्याचे, सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन

  • जिल्हापातळीवर ताप, श्वसनविकारांच्या रुग्णांची नोंद ठेवावी

  • जिल्हापातळीवर कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे

  • जनुकीय अनुक्रम निश्चित करण्याचे प्रमाणही वाढवावे

  • विद्यमान व्यवस्था यंत्रणांचा आढावा घेत त्या सज्ज ठेवाव्यात

  • नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करा

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री-

कोरोना व्हेरियंट शोधण्यासाठी राज्यातील नमुने यापूर्वी पुण्याला पाठवण्यात येत होते. आता ही सोय गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय आणि म्हापसा येथील उपजिल्हा रुग्णालयात केली आहे. सध्या या प्रयोगशाळेत एकूण बाधितांच्या 2 टक्के रुग्णांचे नमुने तपासले जात आहेत.

विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री-

राज्यात दोन लस घेतलेल्यांची संख्या 100 टक्के असून बुस्टर डोस घेतलेल्यांची संख्याही 52 टक्क्यांच्या आसपास आहे. राज्यात सध्या कोणतीच लस उपलब्ध नाही. त्यासाठी राज्य सरकारमार्फत कोविशिल्डसह इतर लसी आणि नाकावाटे घ्यावयाच्या लसीची मागणीही नोंदवली असून लवकरच राज्यात ही उपलब्ध होईल.

डॉ. शिवानंद बांदेकर, डीन, गोवा मेडिकल कॉलेज-

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आणि अधिकच्या उपचारासाठी रुग्णांना रुग्णालयात भरती करावे लागले, तर यासाठीची साधनसुविधा सध्या उपलब्ध आहे. रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा देखील पुरेसा साठा राज्यात उपलब्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT