Child Rights Commission Dainik Gomantak
गोवा

Child Rights Commission: राज्य बालहक्क आयोगावर सरकारची नजर; देखरेख समिती नियुक्त, चौकशी अहवालावर कारवाईची तयारी

Goa Child Rights Commission: आर्थिक शिस्त आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी सरकारने आयोगाच्या खर्चावर नियमित देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्य बालहक्क आयोगाच्या तब्बल तीन वर्षांच्या खर्चाची हिशेब तपासणीच झाली नसल्याचे उघड झाल्यानंतर सरकारने आयोगाच्या आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवण्यासाठी तीन सदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे.

आयोगाच्या कामकाजातील आर्थिक अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, यापूर्वी सचिव पातळीवर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली होती. राज्य बालहक्क आयोगाच्या खर्चाचा तीन वर्षांचा लेखापरीक्षण अहवाल प्रलंबित असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘गोमन्तक’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सचिव स्तरावर चौकशी सुरू केली.

चौकशीत, आयोगाच्या तत्कालीन समितीने खर्चाची हिशेब तपासणी का करून घेतली नाही, तसेच लेखापरीक्षण पूर्ण झाले नसतानाही पुढील वर्षांचे सरकारी अनुदान आयोगाला कशाच्या आधारावर मंजूर करण्यात आले, याचा सविस्तर तपास करण्यात आला आहे. या चौकशीचा अहवाल आता सरकारकडे सादर करण्यात आला असून, त्यातील निष्कर्षांच्या आधारे संबंधितांवर पुढील प्रशासकीय कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

आर्थिक शिस्त आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी सरकारने आयोगाच्या खर्चावर नियमित देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आयोगाचे अध्यक्ष शशिकांत पुनाजी, आयोगाचे सचिव आणि शलाका देसाई यांचा समावेश असलेली तीन सदस्यीय देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आयोगाच्या खर्चाचे परीक्षण करणार असून निधीचा वापर नियमानुसार होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवणार आहे.

सदस्यपदातही केला बदल!

राज्य बालहक्क आयोगाची फेररचना करताना सदस्यपदातही बदल करण्यात आला आहे. विभा भोसले यांच्या जागी केतकी गडेकर यांची आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त आणण्याच्या दृष्टीने सरकारने ही पावले उचलल्याचे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

SCROLL FOR NEXT