Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa News: मुले पळवणाऱ्या टोळीची धास्ती; विद्यार्थ्यांचा सुरक्षितेसाठी सावधगिरी बाळगा!

Goa: डॉन बॉस्को हायस्कूलतर्फे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विशेष नियमावली जारी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: गोवा राज्यात शाळांतील मुलांना पळवणारी टोळी सक्रिय झाल्याच्या काही बातम्या व संदेश सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये सध्या कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. याचे गांभीर्य ओळखून कळंगुट येथील डॉन बॉस्को हायस्कूलतर्फे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पालक तसेच मुलांसाठी विशेष नियमावली जारी केली आहे. डॉन बॉस्को हायस्कूलचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थी सुरक्षित राहण्यासाठी सावधगिरी बाळगण्याची विनंती केली आहे.

डॉन बॉस्को हायस्कूलने सुचविलेले उपाय

1. कोणत्याही क्षेत्रात मुलांनी एकटे फिरू नये. गटागटाने फिरावे.

2. अनोळखी व्यक्तींच्या वाहनावरून प्रवास करू नये आणि विद्यार्थ्यांनी नेहमी पालकांसोबत राहावे.

3. शाळेच्या परिसरात कोणतीही व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे.

4. पालकांव्यतिरिक्त घरी किंवा शाळेत सोडण्याची तयारी दर्शविणाऱ्या व्यक्तीच्या वाहनाचा क्रमांक नोंद करावा.

5. तुम्हाला शाळेतून नेण्यासाठी घरातून पाठविले आहे, असे सांगणाऱ्यांसोबत जाऊ नका.

सावियो फर्नांडिस सालेस, मुख्याध्यापक, डॉन बॉस्को हायस्कूल-

खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही विद्यार्थ्यांसाठी परिपत्रक जारी केले आहे. कारण कथित अपहरणाच्या प्रयत्नांची प्रकरणे समोर आली आहेत आणि सोशल मीडियावर तसे संदेशही फिरत आहेत. आम्ही पालकांना व्हॉट्स अ‍ॅपवर परिपत्रक पाठविण्यासह इतर उपाययोजनाही केल्या आहेत. दररोज पहिला वर्ग सुरू होण्यापूर्वी एखादा विद्यार्थी गैरहजर दिसल्यास त्याच्या घरी फोन करून माहिती घेतली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran Peace Deal: "द डील इज कम्प्लीट!" अमेरिका आणि इराण यांच्यात ऐतिहासिक शांतता करार; 19 जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये होणार अधिकृत स्वाक्षरी

मोदी सरकारसमोर 'संकटांची मालिका'; युद्ध, महागाई आणि विद्यार्थी आंदोलनांचे गडद ढग!

Goa Weather Update: पावसाची दडी अन् उन्हाचा चटका; बळीराजाच्या चिंतेत दिवसागणिक भर!

Mayde Village: मयडेला शहर घोषित करण्यास विरोध, ग्रामसभेने प्रस्ताव फेटाळला; ग्रामीण अस्तित्व कायम ठेवण्याचा ठराव

...अन् आईने फोडला हंबरडा! अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी; तिघा मदार बंधूंवर शोकाकुल स्थितीत अंत्यविधी

SCROLL FOR NEXT