Amit Patkar At Goa Assembly Dainik Gomantak
गोवा

गोव्याचे मुख्य सचिव पुनीत गोयल अडचणीत, 2.6 कोटींची जमीन खरेदी वादात; Land Conversion चा आरोप

Illegal Land Conversion: गोयल यांच्या जमीन खरेदीसंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सरकारने या विषयी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी होतेय.

गोमंतक ऑनलाईन टीम

पर्वरी: गोव्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांनी हळदोणा येथे २.६ कोटींना १,८७५ चौरस मीटर जमीन खरेदी केली आहे. सदर जमीन 'रुपांतरीत' आहे आणि त्या प्रक्रियेत सनदी अधिकारी म्हणून गोयल यांचा सहभाग होता.

हे नैतिकदृष्ट्या अयोग्य असून, हा भ्रष्टाचार आहे, असा आरोप करत आज काँग्रेसने गोयल यांना घेराव घालण्यासाठी सचिवालयाकडे धाव घेतली. पोलिसांनी संतप्त कार्यकर्त्यांना रोखले, यावेळी झटापटही झाली.

गोयल यांचे जमीन खरेदी प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. उपलब्ध माहितीनुसार, 'रूपांतरीत' जमिनीचा व्यवहार १८ मे रोजी झाला.

काँग्रेसने केलेल्या दाव्यानुसार, जमीन रूपांतरणाच्या फाइलवर मुख्य सचिवांनी जमीन खरेदी करण्यापूर्वी स्वाक्षरी केली आहे, जे आक्षेपार्ह आहे

पुनीत कुमार गोयल यांनी हळदोणे येथील सर्वेक्षण क्र. ३६/१ वरील भूखंड कलम १७/२ अन्वये रुपांतरीत केला. हा प्रकार भ्रष्टाचाराचा भाग असून, त्यांनी पदावरून तत्काळ पायउतार व्हावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

व्हिडिओ व्हायरल

गोयल यांच्या जमीन खरेदीसंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर विविध स्तरांतील घटकांमधून याविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सरकारने उपरोक्त विषयी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्याचे मुख्य सचिव पुनीत गोयल यांची विनाकारण बदनामी करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या परवानगीनेच गोयल यांनी जमीन खरेदी केली आहे.
विश्वजीत राणे, नगरनियोजन मंत्री

1) काँग्रेसने सचिव १ मुख्य गोयल यांना घेराव घालण्याचे आज सकाळी सुतोवाच केले. त्यानुसार दुपारनंतर सचिवालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले.

2) त्यांनी सचिवालयात जाण्याचा प्रयत्न केला. परंतु तत्पूर्वीच चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखले.

3) यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. किरकोळ झटापटही झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: ''टीममध्ये काहीतरी गडबड...''! भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवावर चेतेश्वर पुजारा संतापला, फलंदाजांना फटकारले VIDEO

Sheikh Hasina: वडिलांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांच्याच मुलीला त्याच देशात फाशीची शिक्षा का ठोठावली जातेय? जाणून घ्या तीन कारणं

VIDEO: "सह्याद्रीत जन्म, सह्याद्रीतच राहणार...", 'ओंकार हत्ती'ला वनतारात हलवण्याच्या निर्णयाला सिंधुदुर्गवासियांचा तीव्र विरोध

Pooja Naik: "जर खरोखर निर्दोष असाल तर कुटुंबासह शपथ घ्या!", पालेकरांचे वीजमंत्र्यांना नार्को टेस्टचे आव्हान

Goa Crime: मडगावात खळबळ! खारेबांध परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT