Goa Chief Minister’s t Scheme Dainiak Gomantak
गोवा

नोकरी मागे धावण्यापेक्षा उद्योजक बना! स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची गोमंतकीय तरुणांना सुवर्णसंधी; मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेचे विशेष पाऊल

Goa Chief Minister’s t Scheme: सरकारच्या ‘मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजने’अंतर्गत गोव्यातील तरुण आणि नवउद्योजकांसाठी तीन दिवसीय विशेष ‘उद्योजकता विकास प्रशिक्षणा’चे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: सरकारच्या ‘मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजने’अंतर्गत गोव्यातील तरुण आणि नवउद्योजकांसाठी तीन दिवसीय विशेष ‘उद्योजकता विकास प्रशिक्षणा’चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण २० ते २२ मे या कालावधीत सकाळी ९.३० ते सायं. ५ वा. पणजी येथील ‘ईडीसी हाऊस’ पणजी येथे होणार असून विद्यार्थी, शिक्षक, ईडीसी कर्जदार यांच्यासाठी हे प्रशिक्षण मोफत असून इतरांसाठी ७५० व जीएसटी असे शुल्क आकारण्यात येणार आहे.

उद्योग जगतात प्रवेश करत स्वतःचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या गोमंतकीयांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.इच्छुक उमेदवारांनी ediigoa.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच +९१ ६३५७ ०७६ ३१४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या गोव्यातील तरुणांसाठी ही एक उत्तम संधी असून, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विविध पैलूंवर मार्गदर्शन

​या प्रशिक्षणादरम्यान सहभागींना व्यवसायाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले जाईल. यामध्ये प्रामुख्याने उद्योजकतेचे सार आणि कौशल्ये: यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक गुण, आर्थिक व्यवस्थापन, व्यवसायातील भांडवल आणि पैशांचे नियोजन, व्यवसायाशी संबंधित कायदे आणि नियम, मार्केटिंग आणि ब्रँडिंग, व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यासाठी मार्केटिंगची तंत्रे, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आणि साहाय्यकारी संस्थांची माहिती आदींची माहिती पुरविण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT