NGO : Dainik Gomantak
गोवा

NGO : चुकणाऱ्या ‘एनजीओं’वरही टीका करावी : मुख्यमंत्री डॉ. सावंत

NGO : ‘गोमन्तक’च्या विलास महाडिक, नरेंद्र तारी यांचा सत्कार

गोमन्तक डिजिटल टीम

NGO : पणजी, पत्रकारिता हे तळागाळातील जनमानसांचा आवाज पोहचिविण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. ज्या प्रकारे पत्रकार सरकार व राजकारण्यांवर निर्भिडपणे लिहितात त्याचप्रमाणे राज्याच्या हितासाठी बिगर सरकारी संस्था (एनजीओ) ज्या चुकतात, तेव्हा त्यांच्यावरदेखील टीका होणे किंवा किमान दुसरी बाजू दाखविणेही गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

ते इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा येथे आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माहिती आणि प्रसिद्धी संचालनालयाचे संचालक दीपक बांदेकर, गोवा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजतिलक नाईक उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री म्हणाले, मी असा मुख्यमंत्री आहे जो आपल्या अर्थसंकल्पाच्या कारवाईचा अहवाल दुसऱ्या अर्थसंकल्पापूर्वी प्रकाशित करतो.

पत्रकारांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच पत्रकारांनी इलेक्ट्रिक मोटारसायकल योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार लिहितात यामुळेच प्रशासनावर वचक रहात असल्याचेही त्यांनी सांगितले. गोवा सरकारचे अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदयाचे स्वप्न साकार करण्यासाठी माध्यमांनी सहकार्य करावे. सरकारला विरोध करतानाच सरकारच्या चांगल्या उपक्रमांना देखील प्रसिद्धी द्यावी असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

अधिकारी घाबरतात का?

पत्रकारांचा केवळ १६ नोव्हेंबर दिवशीच सन्मान केला जावा, असे होता कामा नये. पत्रकार लोकशाही आणि समाजासाठी अति महत्त्वाचा घटक आहे. आम्ही कोणाचे शत्रू नसून जनतेचे प्रश्‍न विचारणे हे आमचे कार्य आहे. आजकाल सरकारी अधिकारी पत्रकारांना माहिती देणे टाळतात. अधिकारी एवढे का घाबरतात? अधिकाऱ्यांद्वारे माहिती न मिळणे ही शोकांतिका असल्याचे पत्रकार ॲश्‍ली रोझारियो यांनी सांगितले.

पत्रकार पुरस्कार प्रदान

दरवर्षी देण्यात येणारे पत्रकार पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात आले. यंदा सर्वोत्कृष्ट संपादक पुरस्कार पांडुरंग गावकर यांना प्रदान करण्यात आला, तसेच पत्रकार मुरारी शेट्ये, धनुष्कार द गामा, अजय लाड, हेमंत परब, स्वप्नील तारी, गौरी मळकर्णेकर यांना विविध गटांत पुरस्कार प्रदान करण्यात आले.

‘गोमन्तक’च्या शिलेदारांचा सन्मान

माहिती आणि प्रसिद्धी खात्याद्वारे गोमंतकीय पत्रकारितेत अमूल्य योगदान देणाऱ्या पाच पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यात ‘गोमन्तक’चे ज्येष्ठ पणजी प्रतिनिधी शेखर ऊर्फ विलास महाडिक, फोंडा प्रतिनिधी नरेंद्र तारी यांच्यासह पत्रकार विजय डिसोजा, ॲश्‍ली रोझारियो, विठू सुकडकर यांचा समावेश होता. यासोबतच प्रमोद खांडेपारकर यांचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील खेड्यापाड्यात, दुर्गम भागात पोहोचणार स्टारलिंकचे हायस्पीड इंटरनेट; CM सावंतांची इलॉन मस्कच्या कंपनीसोबत चर्चा

VIDEO: 14 षटकार, 9 चौकार... वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली! आशिया कपमध्ये 171 धावांची तुफानी खेळी

Goa Crime: विवाहीत असून जबरदस्तीनं अल्पवयीन मुलीशी केलं लग्न, मुख्य आरोपीसह आई व दोन नातेवाईक अडकले; कोर्टाकडून आरोप निश्चित

Omkar Elephant: 'ओंकार'चं रौद्ररुप! वन कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांदेखत बैलाचा बळी, दावणीला बांधलेल्या बैलाला हत्तीने चिरडले

प्रँक राजकारण! गोंयकारांना फसवल्याचा सरदेसाई - परबांचा एकमेकांवर आरोप Watch Videos

SCROLL FOR NEXT