CM pramod sawant
CM pramod sawant  dainik gomantak
गोवा

CM Pramod Sawant: नवीन झुआरी पुलावर खासगी गाडीतून मुख्यमंत्र्यांचा फेरफटका

Akshay Nirmale

CM Pramod Sawant: राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही घेतली होती. दरम्यान, उद्या गुरूवारी नवीन झुआरी पुलाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभुमीवर गोव्यात परतलेल्या मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदारांची बैठक घेत उद्घाटनसह हिवाळी अधिवेशनाबाबत चर्चा केली. तसेच त्यांनी दिल्ली भेटीतील घडामोडींची माहितीही सहकाऱ्यांना दिली. दरम्यान, बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या खासगी गाडीतून नवीन झुआरी पुलावरून फेरफटका मारल्याचे फोट सोशल मीडियात व्हायरल झाले होते.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी राज्याचे वाहतूक मंत्रालय खासगी बसेससाठी विशेष योजना जाहीर करेल, असे सांगितले आहे. या योजनेत 500 ते 600 बसेस असतील, असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, नवीन झुआरी पुलाच्या उद्घाटनाच्या तयारीबाबतही मुख्यमंत्र्यांची आमदारांशी चर्चा झाली.

पंतप्रधान मोदींच्या भेटीत राज्याच्या विकासाबाबत झालेल्या चर्चेविषयीही त्यांनी माहिती दिली. आत्तापर्यंत राज्याच्या विकासाच्या विविध योजनांमध्ये निधीच्या वाट्यात केंद्र सरकारचा वाटा 60 टक्के तर राज्याचा वाटा 40 टक्के असायचा. तो वाटा यापुढील काळात केंद्राकडून 90 टक्के आणि राज्याचे 10 टक्के असा असावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT