Goa Staff Selection Commission Dainik Gomantak
गोवा

Goa Staff Selection Commission: सप्टेंबरमध्ये नोकरभरतीची पहिली जाहिरात; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती

गोवा राज्य निवड आयोगाच्या वेबसाईटचे अनावरण

Akshay Nirmale

Staff Selection Commission Website Launch: आमचे सरकार जाहीरनाम्यात दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करते. बजेटमध्ये दिलेली आश्वासनेही पुर्ण करते. त्याच क्रमात आज, गुरूवारी आम्ही कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) च्या वेबसाईटचे अनावरण केले आहे.

पाटोतील प्लेसिस बिल्डिंगमधील सहाव्या मजल्यावर आयोगाचे कार्यालय असेल. www.gscc.goa.gov.in ही आयोगाची वेबसाईट इंग्रजी, कोकणी आणि मराठी या तिन्ही भाषेमध्ये आहे. दिव्यांगांना देखील ही वेबसाईट सहजरित्या वापरताय येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, एक महिन्यात सरकारमधील सर्व विभागातील रिक्त पदांची माहिती, तसेच जी पदे रिक्त होणार आहेत अशा पदांची माहिती या वेबसाईटला कळविण्यास सांगितले आहे. एक ऑगस्टनंतर आयोग त्यावर कार्यवाहीस सुरवात करेल.

जीपीएससी सोडून जी पदे आहेत ती सर्व आयोगाच्या अखत्यारीत येतात. जिथे सर्वात कमी पदांची भरती आहे, त्याबाबतची जाहिरात सप्टेंबरमध्ये काढण्याचे आमचे प्रयत्न आहेत. तर प्रमुख पदांच्या भरतीची जाहीरात सप्टेंबर अखेर ते ऑक्टोबर या काळात प्रसिद्ध करू शकतो.

ते म्हणाले, सिटिझन सर्व्हिस सेंटरमार्फत किंवा खेडेगावात जे आंत्रप्रुनरचे जे सेटअप आम्ही उभारले आहे, त्यांच्यामार्फत ही वेबसाईट अॅक्सेस करता येऊ शकेल.

जिथे इंटरनेट कनेक्शनची समस्या असेल तिथे अशा केंद्रांची मदत उमेदवारांना घेता येऊ शकेल. जीपीएससीकडील पदे जीपीएससी स्वतंत्रपणे भरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT