Ramdev baba with Goa Cm And Brahmeshanand Acharya Swamiji Dainik Gomantak
गोवा

Ramdev Baba Yoga : गोव्याला योगभूमी बनवण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करणार : मुख्यमंत्री

आजपासून तीन दिवसीय योग शिबीराला प्रारंभ

Rajat Sawant

Miramar Beach : गोवा सरकार राज्याला योगभूमी बनवण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करेल असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत दिले.

योग, प्राणायाम, आयुर्वेद व प्राकृतिक चिकित्सा उपचारांच्या शिबिराची सुरूवात आज मिरामार समुद्र किनारी झाली. शिबीराला मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, बाबा रामदेव, ब्रम्हेशानंदाचार्य स्वामीजी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री व ब्रम्हेशानंदाचार्य स्वामीजींनी योगासने केली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, योग, आयुर्वेद या इंटीग्रेटेड थेरपीद्वारे उपचार करण्याच काम पतंजली योग समिती करत आहे. गोवा हे सुर्य, वाळू आणि समुद्र यासाठी ओळखला जातो. याच गोव्यात आता आध्यात्मिक पर्यटनासही प्रारंभ करण्यात येणार आहे.

येथे येणाऱ्या पर्यटकांना हेल्दी लाईफस्टाईल मिळावी, योगाची माहिती व्हावी यासाठी त्यांचे योगदान राहील. गोवा योगभूमी व्हावी यासाठी सरकार आवश्यक ती सर्व मदत करणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

सर्वांच्या सोयीसाठी तालुकावार तसेच काही गावातून योग शिबिरात येण्यासाठी बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच आज महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शिवपिंडीला अभिषेक करता यावा, पूजन करता यावे यासाठी बारा ज्योतिर्लिंग तसेच प्रिसिध्द वाळू शिल्पकार मानस साहू यांच्याद्वारे शिवपिंडीचा देखावा साकारण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: नावेलीत दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण

मडगावात दाखल होणार 'राम दिग्विजय रथयात्रा'! पर्तगाळ मठाच्या वर्धापन वर्षानिमित्त होणार आगमन; कुठे घ्याल दर्शन? वाचा माहिती

Panaji Politics: 'पणजीवासीय साथ देतील याची खात्री'! पर्रीकर यांचे ‘मनपा’साठी ‘एकला चलो रे’; भाजपचा अपेक्षित प्रतिसाद नसल्याने पवित्रा

Konkan Railway: कोकण रेल्वे गाड्यांना रोज होतोय उशीर, 1 ते 3 तास होतोय विलंब; संतप्त प्रवाशांनी लिहिले महामंडळाला पत्र

Goa Politics: खरी कुजबुज; महेश मांजरेकरांचा गोवा

SCROLL FOR NEXT