Goa: Group Development Officer Milind Velip, Panchayat Mandal and villagers participated in the check distribution program. Dainik Gomantak
गोवा

Goa: धारबांदोड्यात ८३ पूरग्रस्तांना धनादेश

Goa: पंचायत निधीतून तीन लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे वाटप

Yeshwant Patil

धारबांदोडा : धारबांदोडा पंचायतीतर्फे (Dharbandoda Panchayat) पंचायत निधीतून दावकोण, धुलैय, ओकांब व धडे या भागातील पूरग्रस्त (Flood) कुटुंबांना (Families) धनादेशांचे वितरण (Check Distribution) करण्यात आले आहे. सुमारे ८३ पूरग्रस्तांना एकूण तीन लाख रुपयांचे (Three Lakh Rupees) वितरण करण्यात आले. पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचा पहिला मान हा धारबांदोडा पंचायत मंडळाला जात आहे. सरकार पातळीवर पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. पूरग्रस्ताना मदत करण्यासाठी धारबांदोडा पंचायतीने सर्वप्रथम प्रस्ताव सादर केला. त्यानंतर त्याला उच्च पातळीवरून मान्यता देण्यात आली, असे धारबांदोडा गटविकास अधिकारी मिलिंद वेळीप (Milind Velip) यांनी सांगितले

दावकोण येथील श्री रवळनाथ जल्मी देवस्थानच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर सरपंच स्वाती तिळवे, पंच सदस्य विनायक ऊर्फ बालाजी गावस, यशवंत बांदोडकर, दत्तराज गावस, सुनिता गावकर, परेश खुटकर, पंचायत सचिव सोमनाथ तारी उपस्थित होते. सध्या ऑक्ट्रॉय येणे बंद झाल्याने पंचायती आर्थिक संकटात आहेत. तरीही पंचायत मंडळाने पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला. याला पंचायत संचालकांनी गटविकास अधिकाऱ्यांना सूचना करून मान्यता देण्यात आली. यासाठी आपण पंचायत संचालक व गटविकास अधिकाऱ्यांचा आभारी आहे, असे पंच सदस्य विनायक गावस सांगितले. भूमिपुत्र विधेयकाबद्दल विचारल्यानंतर विनायक गावस म्हणाले, की या विधेयकाबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नाही. त्यामुळे यावर भाष्य करणे योग्य नाही. सरकारने धारबांदोडा तालुक्यातील कुमेरी, आफ्रामेंत व वनहक्क कायद्याखाली देण्यात येणाऱ्या जमिनीच्या सनदा नागरिकांना लवकर द्याव्यात, अशीही मागणी त्यांनी केली. सुनिता गावकर यांनी स्वागत, यशवंत बांदोडकर यांनी सूत्रसंचालन, तर स्वाती तिळवे यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT