CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

'चेक्ड बाय दोतोर' योजनेअंतर्गत राज्‍यातील 40 हजार महिलांची तपासणी, 2 टक्के महिलांवर उपचार सुरू; मुख्यमंत्र्यांची माहिती

Checked by Dotor scheme: ‘चेक्ड बाय दोतोर’ योजनेअंतर्गत आत्तापर्यंत राज्यातील तब्बल ४० हजार महिलांची तपासणी करण्यात आली आहे.

Sameer Amunekar

साखळी: ‘चेक्ड बाय दोतोर’ योजनेअंतर्गत आत्तापर्यंत राज्यातील तब्बल ४० हजार महिलांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे २ टक्के महिलांमध्ये आजार आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. साखळी येथील सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात आयोजित या मोहिमेच्या कार्यक्रमात मुख्‍यमंत्री बोलत होते.

व्यासपीठावर आरोग्‍य अधिकारी डॉ. अतुल पै बीर, हरवळे सरपंच गौरवी नाईक, वेळगे सरपंच योगिता हळदणकर, नगरसेविका विनंती पार्सेकर, साखळी भाजप मंडळ अध्यक्ष रामा नाईक, राज्य भाजप महिला मोर्चा उपाध्यक्ष क्रांती नार्वेकर आदींची उपस्थिती होती.

गोव्यातील महिलांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत सरकारी इस्पितळांबरोबर काही खासगी इस्पितळांनीही सहभाग नोंदवत माफक दरात तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या मोहिमेत रक्तदाब, मधुमेह, क्षयरोग (टीबी) आणि सर्वायकल कॅन्सरसारख्या आजारांची तपासणी करून त्यानुसार उपचार सुरू केले जात आहेत, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

दरम्यान, देशातील परिस्थितीचा संदर्भ देताना मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुयोग्य प्रशासन सुरू आहे. इंधन, गॅस, खत व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी ते सातत्याने राज्यांशी संपर्कात आहेत.

महिलांनी आपल्‍या आरोग्‍याची नियमित तपासणी करावी. आजार प्राथमिक अवस्थेत समजला तर निदान करणे सुलभ आणि शक्‍य होते. तसेच वेळ आणि पैसाही वाचतो. म्‍हणूनच राज्‍यातील जास्‍तीत जास्‍त महिलांनी ‘चेक्ड बाय दोतोर’ योजनेचा लाभ घ्यावा.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT