Banavali rape case Dainik Gomantak
गोवा

Goa: बाणावली सामूहिक बलात्कार प्रकरणातील 4 संशयितांवर आरोपपत्र दाखल

तपास करणाऱ्या पणजी महिला पोलिसांनी (Panajim Women Police) आज मडगाव न्यायालयात 4 संशयितांवर आरोपपत्र दाखल केले.

दैनिक गोमन्तक

मडगाव: दोन महिन्यांपूर्वी बाणावली (Banavali) येथे घडलेल्या आणि त्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरविणाऱ्या बाणावली सामूहिक बलात्कार प्रकरणात (Banavali rape case) तपास करणाऱ्या पणजी महिला पोलिसांनी (Panajim Women Police) आज मडगाव न्यायालयात 4 संशयितांवर आरोपपत्र दाखल केले. 25 जुलै रोजी हा धृणास्पद प्रकार घडला होता. रात्रीच्या वेळी आपल्या मित्रांबरोबर आलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे या संशयितांनी विनयभंग करून नंतर त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. यानंतर त्यांनी त्यांचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 40 हजार रुपये खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला होता.

या प्रकरणात कोलवा पोलिसांनी आसिफ हतेली (Asif Hateli), राजेश माने, गजानंद चिंचाळकर व नितीन येब्बाळ याना अटक केली होती. त्यानंतर हे प्रकरण तपासासाठी पणजी महिला पोलीस स्थानकात दिले होते. या प्रकरणातील तपास अधिकारी उपाधीक्षक एझीलडा डायस यांनी आज हे सुमारे 400 पानी आरोपपत्र दाखल केले असून त्यासोबत 50 साक्षीदारांची यादी जोडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

Goa Politics: म्हापशातील प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक; विकास ठप्प, सत्ताधाऱ्यांनी विकासाऐवजी केवळ घोषणाबाजी केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT