2025 Celebration Goa X
गोवा

New Year Celebration: ..आठवडाभर गोव्यात धूमधाम! 72 पार्ट्या आणि 119 संगीत कार्यक्रम; मलायका, उर्वशीचे Performances

2025 Celebration Goa: गोव्यात पर्यटकांसाठी पुढील ६ दिवस हे अविस्मरणीय ठरणार आहेत. पार्ट्या, स्टार परफॉर्मन्स आणि संगीताच्या संगमामुळे हे दिवस यादगार ठरतील.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa New Year parties and Sunburn events

पणजी: राज्‍यात नाताळला काल मध्‍यरात्री पारंपरिक ‘मास’ने प्रारंभ झाला. राज्यातील सर्व चर्चमध्ये ख्रिश्‍‍चन बांधवांनी गर्दी केली होती. दरम्यान, नाताळाबरोबर नववर्षही जवळ आल्याने पर्यटक मोठ्या संख्‍येने दाखल झाले आहेत. राज्यात पुढील आठवडा प्रचंड गर्दीचा असणार आहे.

पणजीतील मेरी इम्‍यॅक्‍युलेट चर्चसमोर रात्री शेकडो भाविक उपस्‍थित होते. नाताळनिमित्तछोटेखानी मातीचा गोठा करण्‍याची प्रथा आहे. त्‍यात वैविध्‍यपूर्ण संकल्‍पनांसह येशूचा जन्‍म साकारण्‍यात येतो. जागोजागी हे देखावे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. हॉटेल्‍सना प्रतिसाद आहे; परंतु हवा तसा अद्याप सिझन सुरू झालेला नाही, असा दावा करण्‍यात येत आहे.

संगीत पार्ट्यांची मेजवानी

गोव्यात पर्यटकांसाठी पुढील ६ दिवस हे अविस्मरणीय ठरणार आहेत. पार्ट्या, स्टार परफॉर्मन्स आणि संगीताच्या संगमामुळे हे दिवस यादगार ठरतील. पेडणेपासून काणकोणपर्यंत सर्व किनाऱ्यांवर नवीन वर्षाचे स्वागत ७२ पार्ट्या आणि ११९ संगीत कार्यक्रमांसह मोठ्या उत्साहात होणार आहे. ३१ डिसेंबर रोजी एकूण ३२ भव्य पार्ट्या होणार आहेत; तर यापूर्वी २९ आणि ३० डिसेंबर रोजी प्रत्येकी १० पार्ट्या, २८ डिसेंबर रोजी ९ पार्ट्या, २७ डिसेंबर रोजी ७ पार्ट्या आणि २६ डिसेंबर रोजी ४ पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील १९ प्रमुख ठिकाणी होणाऱ्या या पार्ट्यांसोबतच संगीत कार्यक्रमांचा देखील जोरदार कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. ३१ डिसेंबरला २६ मनोरंजनाचे शो होणार आहेत तर २८ आणि ३० डिसेंबरला १७ शो, २९ डिसेंबरला १६ शो, २७ डिसेंबरला १२ शो आणि २६ डिसेंबरला ८ शो होणार आहेत.

जागतिक कलाकारांचा सहभाग

आशियातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टिवल, सनबर्न गोवा २०२४, २८ ते ३० डिसेंबर दरम्यान धारगळ गोवा येथे होणार आहे. या कार्यक्रमात जगभरातील प्रमुख कलाकार स्क्रिलेक्स, अलेसो, पेगी गू, म्राक, आणि केएसएचएमआर परफॉर्म करण्यासाठी येणार आहेत. कार्यक्रम दुपारी २ वाजल्यापासून सुरू होईल. फेस्टिवलच्या तिकिटांची किंमत ३.५ हजार ते ५.९० लाखांपर्यंत आहे..

मलायका, उर्वशी थिरकणार

नवीन वर्षाच्या उत्सवात बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला, मलायका अरोरा, नरगिस फाखरी आणि निया शर्मा यासारख्या स्टार्सच्या जबरदस्त परफॉर्मन्ससोबतच गायक आणि डीजे किंग, डीजे चेतस, डीजे अख्तर आणि जोनिता गांधी यांचाही सहभाग असणार आहे. तसेच, विनोदी कलाकार सुनील ग्रोवर आणि कृष्णा अभिषेक यांचे अॅक्ट्सदेखील असतील. गिप्पी ग्रेवाल, स्कारलेट विल्सन आणि मनारा चोप्रा देखील या कार्यक्रमात चमकणार आहेत.

स्टार परफॉर्मर्स

बॉलिवूड सेलिब्रिटी : उर्वशी रौतेला, मलायका अरोरा,

नर्गिस फाखरी आणि निया शर्मा.

गायक आणि डीजे : किंग, डीजे चेतस, डीजे अख्तर,

जोनिता गांधी.

विनोदी कलाकार :

सुनील ग्रोवर, कृष्णा अभिषेक.

विशेष परफॉर्मन्स : गिप्पी ग्रेवाल, स्कारलेट विल्सन आणि मनारा चोप्रा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT