Goa census Dainik Gomantak
गोवा

Goa Census: जातनिहाय जनगणना होणार 2027 मध्ये! पुढील वर्षी घरांची गणना; 3 हजार प्रगणकांची नियुक्ती

Goa population survey 2027: जातनिहाय जनगणना २०२७ मध्ये ९ ते २७ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. पुढील वर्षी २०२६ मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या वेळी जातविषयक कोणतीही माहिती विचारली जाणार नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: जातनिहाय जनगणना २०२७ मध्ये ९ ते २७ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. पुढील वर्षी २०२६ मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या वेळी जातविषयक कोणतीही माहिती विचारली जाणार नाही.

राज्य जनगणना संयुक्त संचालक के. व्ही. राजेश्वर राव यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले, की जातनिहाय जनगणना कशी असेल. केवळ जातीची नोंदणी होईल की पोटजातीची नोंदणी होईल याविषयी अद्याप काही स्पष्टता नाही. २०२७ च्या फेब्रुवारीपूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून त्याविषयी स्पष्टता मिळेल.

पुढील वर्षी केली जाणारी जनगणना ही केवळ घरांची माहिती नोंदवण्यापुरती मर्यादित असेल. गेल्या जनगणनेवेळी २३ विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. या खेपेला त्यात थोडी वाढ होऊ शकते.

जनगणनेसाठी ३ हजार जण प्रत्येक घरात जाण्यासाठी प्रगणक म्हणून नियुक्त केले जाणार आहे. प्रत्येक सहा प्रगणकामागे एक सर्वेक्षक असेल. त्यानंतर तालुका पातळीवरील अधिकारी असतील. त्यासाठी एकावेळी ४० जणांना या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे.

१९४१ मध्येही जातनिहाय जनगणना झाली होती. मात्र त्याचा तपशील नंतर जाहीर करण्यात आला नाही. त्यानंतर १९५१ पासून २०११ पर्यंत केवळ अनुसूचित जाती, जमातींचीच वेगळी नोंद घेण्यात आली आहे.

महिलांची व मुलांची संख्या, वृद्धांचे प्रमाण, ग्रामीण-शहरी लोकसंख्या, अनुसूचित जातीजमातींची टक्केवारी, तसेच कामगार आणि अवलंबित लोकसंख्येचे गुणोत्तर या सर्व बाबींचा अभ्यास याच माहितीवरून होतो. या आकडेवारीतूनच देशातील शिक्षण, आरोग्य, रोजगार, गृहउभारणी आणि सामाजिक सुरक्षेसाठीची धोरणे ठरवली जातात, असे राव यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

Bhagur Village: इंग्लंडला धडकी भरवणारं भारतातील 'ते' खोडकर गाव, जाणून घ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'भगूर'चा थरारक इतिहास

Canacona: गावडोंगरी-काणकोण येथे काटेकणगांची लागवड, कंदमुळांकडे शेतकऱ्यांचा कल; यंदा 250 टनहून अधिक उत्पादनाची शक्यता

8th Pay Commission: फक्त 'हा' एक नियम बदलणार अन् सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी लागणार, पगार थेट 4 पटीने वाढणार!

4500 मतदारांची नावे वगळल्याचा निषेध, विधानसभेत आवाज उठविण्याचा विजय सरदेसाई यांचा इशारा

SCROLL FOR NEXT