Census In India: देशात जनगणना कधी सुरु होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या

Indian Census Two Phase 2026: केंद्र सरकारने देशात जातीय जनगणनेची घोषणा आधीच केली आहे. आता सरकारने तारखा देखील जाहीर केल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतात 1 ऑक्टोबर 2026 पासून जातीय गणनेसह जनगणना सुरु होईल.
Indian Census Two Phase 2026
Census In IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्र सरकारने देशात जातीय जनगणनेची घोषणा आधीच केली आहे. आता सरकारने तारखा देखील जाहीर केल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतात 1 ऑक्टोबर 2026 पासून जातीय गणनेसह जनगणना सुरु होईल. ही जनगणना देशभरात दोन टप्प्यात केली जाईल. 1951 पासून दर 10 वर्षांनी जनगणना केली जात होती. मात्र कोरोनामुळे 2021 मध्ये पुढे ढकलण्यात आली. धोरणे तयार करण्यसोबत देशाच्या संसाधनांचे समान वितरण सुनिश्चित करण्यासाठी जनगणनेचा डेटा सरकारसाठी महत्वाचा असतो.

1 ऑक्टोबर 2027 पासून मैदानी राज्यांमध्ये जनगणना

मिळालेल्या माहितीनुसार, लडाख, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश यासारख्या डोंगराळ राज्यांमध्ये 1 ऑक्टोबर 2026 पासून जनगणना सुरु होईल. त्याचवेळी, मैदानी प्रदेशात 1 मार्च 2027 पासून जातीय जनगणना सुरु होईल. 2026 मध्ये झालेल्या जनगणनेनंतर भविष्यात जनगणनेचे चक्र बदलेल.

Indian Census Two Phase 2026
China India Threat: पाकिस्तान नव्हे, भारताचा खरा शत्रू चीन! अमेरिकन गुप्तचर अहवालात धक्कादायत दावा, काय आहे Report? वाचा..

केंद्रीय गृह मंत्रालयाने सविस्तर माहिती दिली

गृह मंत्रालयाने सांगितले की, 'जातीय जनगणनेसह लोकसंख्या जनगणना-2027 दोन टप्प्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसंख्या जनगणना-2027 साठी संदर्भ तिथि मार्च 2027 च्या पहिल्या दिवशी 00:00 वाजता असेल. लडाख आणि जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशासाठी तसेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि इतर राज्यांसाठी संदर्भ तिथि अक्टूबर 2026 च्या पहिल्या दिवशी 00:00 वाजता असेल. जनगणना कायदा 1948 च्या कलम 3 च्या तरतुदीनुसार वरील संदर्भ तिथींसह लोकसंख्या जनगणना करण्याच्या हेतूची अधिसूचना 16.06.2025 रोजी अधिकृत राजपत्रात प्रकाशित केली जाईल.'

पहिली जनगणना 1872 मध्ये झाली तर शेवटची 2011 मध्ये!

भारतात (India) दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. पहिली जनगणना 1872 मध्ये झाली होती. स्वातंत्र्यानंतर पहिली जनगणना 1951 मध्ये झाली. शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली. आकडेवारीनुसार, 2011 मध्ये भारताची एकूण लोकसंख्या 121 कोटी होती, तर लिंग गुणोत्तर 1000 पुरुषांमागे 940 महिला होत्या तर साक्षरता दर 74.04 टक्के होता.

Indian Census Two Phase 2026
Air India New Deal: विमान एयरबसचं, इंजिन रॉल्स रॉयसचं..., भारतासोबत तीन बड्या देशांची डील

देशात शेवटची जातीय जनगणना कधी झाली?

देशात पहिली जातीय जनगणना 1881 मध्ये झाली होती. पहिल्या जनगणनेत जातीनिहाय जनगणना डेटा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर दर दहा वर्षांनी जनगणना करण्यात येत होती. 1931 पर्यंतच्या जनगणनेतही प्रत्येक वेळी जातीनिहाय डेटा प्रसिद्ध करण्यात येत होता. मात्र 1941 च्या जनगणनेत जातीनिहाय डेटा गोळा करण्यात आला, परंतु तो जाहीर करण्यात आला नाही. स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक जनगणनेत सरकारने फक्त अनुसूचित जाती आणि जमातींचा जातीनिहाय डेटा प्रसिद्ध केला. 1931 नंतर इतर जातींचा जातीनिहाय डेटा कधीही प्रकाशित करण्यात आला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com