Goa Casino Dainik Gomantak
गोवा

Goa Casino: गोव्यातील कॅसिनोंमध्ये 21 वर्षांखालील तरुणांना प्रवेशबंदी; कडक परवाना आणि 18% व्याजाची दंडात्मक कारवाई

Goa casino licence Rules: वार्षिक परवाना शुल्क भरण्यास विलंब करणाऱ्या कॅसिनोचालकांना यापुढे दंड म्‍हणून थकीत रकमेवर १८ टक्‍के वार्षिक दराने व्याज भरावे लागणार आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी : वार्षिक परवाना शुल्क भरण्यास विलंब करणाऱ्या कॅसिनोचालकांना यापुढे दंड म्‍हणून थकीत रकमेवर १८ टक्‍के वार्षिक दराने व्याज भरावे लागणार आहे.

शिवाय इलेक्ट्रॉनिक गेमिंग मशिन्स, स्लॉट मशिन्स किंवा टेबल कॅसिनोंमध्ये २१ वर्षांखालील व्यक्तींना प्रवेशबंदी गेम्स चालविल्या जाणाऱ्या निश्चित गेमिंग क्षेत्रामध्ये २१ वर्षांखालील व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नसल्‍याचेही पुन्‍हा एकदा स्‍पष्‍ट करण्यात आले आहे. गृह खात्‍याने गोवा सार्वजनिक जुगार कायदा १९७६ मध्‍ये दुरुस्‍ती करीत परवाना शुल्क भरणा, पंचतारांकित हॉटेल्स तसेच समुद्रातील जहाजांवरील गेमिंग क्षेत्रांत प्रवेशाबाबत अधिक कडक तरतुदी लागू केल्‍या आहेत.

खात्‍याचे अवर सचिव मंथन नाईक यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. समुद्रातील कॅसिनोंचे मालक वार्षिक परवाना शुल्‍क देण्‍यास विनाकारण विलंब करतात. त्‍याचा फटका सरकारच्‍या महसुलास बसतो. त्‍यामुळे यापुढे वार्षिक परवाना शुल्‍क भरण्‍यास जे कॅसिनो विलंब करतील, त्‍यांच्‍यावर दंडात्‍मक कारवाई म्‍हणून त्‍यांच्‍याकडून थकीत रकमेवर वार्षिक १८ टक्‍के व्‍याज घेण्‍याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

SCROLL FOR NEXT