30 lakh loot Delhi arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Casino Crime : गोवा कॅसिनोचा नाद नडला! जुगार खेळण्यासाठी लुटले 30 लाख; दिल्लीत सोनारासह चौघे जेरबंद

Goa Casino Fraud : या टोळीने चोरीचा पैसा गोव्याच्या कॅसिनोमध्ये जुगार खेळण्यासाठी आणि चैनीच्या जीवनासाठी वापरण्याचे नियोजन केले होते

Akshata Chhatre

नवी दिल्ली: पश्चिम दिल्लीतील पंजाबी बाग परिसरात नुकत्याच झालेल्या एका मोठ्या घरफोडीच्या घटनेचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका सोनारासह चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेले अंदाजे ३० लाख रुपयांचे सोने आणि रोकड जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या टोळीने चोरीचा पैसा गोव्याच्या कॅसिनोमध्ये जुगार खेळण्यासाठी आणि चैनीच्या जीवनासाठी वापरण्याचे नियोजन केले होते.

मुख्य सूत्रधार आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी

या संपूर्ण चोरीच्या कटाचा मुख्य सूत्रधार जय प्रकाश (वय ३२) हा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जय प्रकाशवर यापूर्वीच चोरीचे १५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही त्याने पुन्हा एकदा मोठी चोरी करण्याची योजना आखली. पंजाबी बागेतील एका घरात हात साफ करण्याची योजना त्याने त्याचे दोन साथीदार, बिगन साह (वय २६) आणि जयराम साह (वय ४५) यांच्यासोबत मिळून तयार केली होती. या तिघांचा मुख्य उद्देश चोरीच्या रकमेतून गोव्यातील कॅसिनोमध्ये जुगार खेळून आपली हौस पूर्ण करणे हा होता.

सोनाराचा सहभाग आणि चैनीची आवड

चोरी झालेल्या सोन्याची विल्हेवाट लावण्यासाठी या टोळीला गणेश (वय ३१) नावाच्या एका स्थानिक सोनाराने मदत केली. गणेश यालाही पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून केलेल्या चौकशीत असे निष्पन्न झाले आहे की, जुगार खेळण्याच्या व्यसनामुळे आणि आलिशान जीवनशैलीच्या हव्यासातून त्यांनी हा गुन्हा केला. झटपट पैसा मिळवून आपल्या चैनीच्या सवयी पुरवण्यासाठी त्यांनी ही मोठी घरफोडी केली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांकडून मोठी कारवाई

दिल्ली पोलिसांनी या चारही आरोपींना तत्परतेने अटक करून त्यांच्याकडील चोरीचा ऐवज हस्तगत केला आहे. एका सराईत गुन्हेगारासह सोनाराला अटक करण्यात यश आल्याने या परिसरात तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र, जुगार आणि चैनीच्या व्यसनापोटी तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झालेय. या चौघांवरही आता योग्य त्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Murder Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT