Goa Cashew Festival 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Cashew Festival 2025: पहलगाम हल्ल्यामुळे मोठा बदल! काजू महोत्सव पुढे ढकलला, नवीन तारखा लवकरच होणार जाहीर

Pahalgam Terror Attack Impact: गोव्यात 25 ते 27 एप्रिल या कालावधीत काजू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आता, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तो पुढे ढकलण्यात आला.

Manish Jadhav

पणजी: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी (22 एप्रिल) दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पहलगामध्ये आलेल्या पर्यटकांना निशाणा बनवले, ज्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा देशभरातून निषेध होत आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरच आता गोव्यात होणारा काजू महोत्सव देखील पुढे ढकलण्यात आला. बुधवारी (23 एप्रिल) यासंबंधी निवेदन जारी करुन सांगण्यात आले.

काजू महोत्सव पुढे ढकलला

दरम्यान, गोव्यात (Goa) 25 ते 27 एप्रिल या कालावधीत काजू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आता, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तो पुढे ढकलण्यात आला. काजू महोत्सवाच्या नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असे निवेदन जारी करुन सांगण्यात आले.

गोव्यात एप्रिल महिन्यापासून सुरु होणारा काजूचा हंगाम जून महिन्यापर्यंत चालतो. याच काळात काजू महोत्सवाचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या दिमाखात तीन दिवसीय काजू महोत्सवाचे आयोजन केले जाईल, अशी माहिती वन विकास महामंडळाच्या अध्यक्षा आणि आमदर देविया राणे यांनी दिली होती.

काजू महोत्सवाचे तिसरे वर्ष

गोव्यात यंदाचे काजू महोत्सवाचे (Goa Cashew Festival 2025) तिसरे वर्ष आहे. 25, 26 आणि 27 एप्रिल असे तीन दिवसांसाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आता पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हा महोत्सव पुढे ढकलण्यात आला.

'वाढदिवस साजरा करणार नाही'

राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनीही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. गुरुवारी (24 एप्रिल) मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस असून त्यांनी आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, ''गुरुवारी माझ्या वाढदिवासनिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम मी रद्द करत आहे. केवळ सेवा कार्यक्रम होतील. वाढदिवासानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यास मी साखळी किंवा पणजीत उपलब्ध नसेन, त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते, चाहते आणि शुभचिंतकांनी वाढदिवासाच्या शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT