
Goa Shigmo Festival Preservation CM Pramod Sawant Tourism Minister
शिरोडा: राज्यातील विविध भागातील लोककलाकार शिमग्याच्या मांडावर नमन घालून आपली सेवा देवाला अर्पण करतात. अशा कलाकारांची विशेष आठवण ठेवून त्यांचा ताशा वाद्य भेट देऊन सत्कार हा कौतुकास्पद उपक्रम आहे. लोकसंस्कृतीतून परंपरेचे दर्शन घडवताना संस्कृती टिकवून ठेवण्याचे काम होत आहे. शिमगोत्सवाची परंपरा जतन करुन ठेवण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पर्यटनमंत्री रोहन खंवटे कटिबद्ध आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी सांगितले.
शिरोडा येथे शिरोडा शिमगोत्सव समितीतर्फे कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नाईक बोलत होते. मंत्री शिरोडकर म्हणाले की, राज्यामध्ये शिमगा हा सर्व लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा उत्सव बनलेला आहे. शिमगोत्सव आयोजन करणाऱ्या समितीकडून योग्य प्रकारे शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित केला तर मिरवणूक वेळेवर सुरु होऊन नागरिकांना (Citizens) त्याचा आनंद घेता येतो.
दरम्यान, यावेळी सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, शिरोड्याच्या सरपंच मुग्धा शिरोडकर, जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, बोरीचे सरपंच जयेश नाईक, बेतोड्याचे सरपंच मधू खांडेपारकर, पंचवाडीच्या सरपंच लीना फर्नांडिस, शिरोडा भाजप (BJP) मंडळाचे अध्यक्ष अक्षय गावकर, माजी अध्यक्ष सूरज नाईक, आयोजन समितीच्या डॉ. गौरी शिरोडकर, शिरोडा शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष बिपिन नाईक, बोरीच्या उपसरपंच भावना नाईक, पंच राखी गावकर आदी उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.