Goa Cashew Dainik Gomantak
गोवा

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

Divya Rane: आपल्या राज्यातील काजूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ती चवीच्या दृष्टीने चांगली असून सेंद्रीय जंगलातील काजू थेट विक्री केली जात आहे.

Sameer Amunekar

पणजी: आपल्या राज्यातील काजूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ती चवीच्या दृष्टीने चांगली असून सेंद्रीय जंगलातील काजू थेट विक्री केली जात आहे.अस्सल गोमंतकीय काजू जगभरातील खवय्यांना चाखता याव्यात यासाठी आम्ही प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष तथा आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केले.

त्या वन विकास महामंडळाच्या सिल्वन काजू उत्पादनाचा कांपाल महावीर उद्यानात सुरू करण्यात आलेल्या फॅक्टरी आऊलेटच्या उद्घाटनसमयी बोलत होत्या.

यावेळी गोवा वन विकास महामंडळाचे व्यवस्थापक अमर हेबळेकर, वनअधिकारी कमल दत्ता, व्यवस्थापकीय संचालक के. रमेश दत्ता, मुख्य वनसंरक्षक अधिकारी प्रविण कुमार राघव, विरेंद्र चौधरी व रेंज फॉरेट अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान डॉ. दिव्या राणे म्हणाल्या, आमचे काजूगर मोर्ले, केपे, काणकोण किंवा फोंडा वन वनविभाग क्षेत्रातील आहेत हे पाकीटावरील क्युआर कोट स्कॅन केल्यावर कळून येईल त्यामुळे अशा प्रकारे विशिष्ट स्थानावरील काजू विकणारे गोवा वन विकास महामंडळाचे एकमेव उत्पादन असल्याचे त्यांनी सांगितले.

जीआय टॅग

  • विशिष्ट ठिकाणावरील सिंगल सोर्स काजूगर उत्पादन केवळ गोवा वन विकास महामंडळाद्वारे विकण्यात येत आहे.

  • काजूला लवकरच जीआय टॅग मिळेल.

  • मागीलवर्षी काजूचा दर कमी होता, कारण आफ्रिकन काजू मोठ्या प्रमाणात आयात केला जायचा. परंतु सरकारने ४० टक्के अधिक दराने काजू खरेदी करण्यात आल्याने मार्केटमध्ये स्थानिक काजूचा दर वाढला.

  • गोवा वन विकास महामंडळाच्या काजू उत्पादनाच्या नफ्यात वाढ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT