Goa Cash For Jobs Scam Dainik Gomantak
गोवा

Goa Cash For Job Scam: निवृत्त पोलिसालाच 10 लाखांचा चुना! मुलाला 'PSI' बनवण्याच्या नावाखाली फसवणूक; फोंड्यात दोघांवर गुन्हा दाखल

Retired PSI Cheated Goa: गोव्यात कॅश फॉर जॉब घोटाळ्यात आता आणखी एका नव्या प्रकरणाची भर पडली. या नव्या प्रकरणात चक्क एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकालाच लक्ष्य करण्यात आले.

Manish Jadhav

पणजी: गोव्यात कॅश फॉर जॉब घोटाळ्यात आता आणखी एका नव्या प्रकरणाची भर पडली. या प्रकरणात चक्क एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकालाच लक्ष्य करण्यात आले असून, फोंडा पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा दोन संशयित आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आपल्या मुलाला पोलीस दलात पीएसआयची नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला तब्बल 10 लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले.

फोंडा पोलिसांनी फसवणुकीच्या या नवीन गुन्ह्याखाली दोन व्यक्तींवर गुन्हा नोंदवला. यामध्ये खांडेपार-फोंडा येथील रहिवासी रुपेश साखरकर आणि हळदोणा-बार्देश येथील रहिवासी टॉमी मिरांडा या दोघांचा समावेश आहे. या दोन्ही संशयितांनी मिळून तक्रारदार निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाला पोलीस खात्यात पीएसआय पदाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित व्हावे आणि त्याला चांगल्या पदावर नोकरी मिळावी या हेतूने या निवृत्त अधिकाऱ्याने संशयितांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.

तक्रारदार निवृत्त पीएसआयने संशयित आरोपींना मुलाच्या नोकरीच्या कामासाठी तब्बल 10 लाख रुपयांची मोठी रक्कम दिली होती. विशेष म्हणजे, हा सर्व व्यवहार पूर्णपणे कॅश स्वरुपात करण्यात आला. मात्र, पैसे देऊनही मुलाला नोकरी मिळाली नाही आणि दिलेली रक्कमही परत न मिळाल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली.

फोंडा (Ponda) पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत गुरुवारी रुपेश साखरकर आणि टॉमी मिरांडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाचे चक्र फिरवले असले, तरी या प्रकरणात अद्याप संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या घोटाळ्याची पाळेमुळे कुठेपर्यंत पसरली आहेत, याचा शोध घेतला जात आहे. थेट एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यालाच पीएसआय पदाचे आमिष दाखवून 10 लाखांचा गंडा घातल्याचे समोर आल्याने संपूर्ण राज्यात आणि पोलीस वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT