Sunita Sawant, Akshat Kaushal Dainik Gomantak
गोवा

Cash For Job: SIT Investigation वरुन गदारोळ! पोलिसांनी राजकीय संबंधांची शक्यता फेटाळली; विरोधकांची कडाडून टीका

Goa Police: राज्यात गाजणाऱ्या नोकऱ्यांच्या चोर बाजारप्रकरणी राजकारण्यांचा संबंध असेल, असे राज्यातील प्रत्येकाला भले वाटतही असेल; पण पोलिसांना मात्र तसे वाटत नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Cash For Job SIT Investigation

पणजी: राज्यात गाजणाऱ्या नोकऱ्यांच्या चोर बाजारप्रकरणी राजकारण्यांचा संबंध असेल, असे राज्यातील प्रत्येकाला भले वाटतही असेल; पण पोलिसांना मात्र तसे वाटत नाही. या प्रकरणात राजकारण्यांचा संबंध आजवरच्या तपासात पुढे आलेला नाही, असे दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी आज पोलिस मुख्यालयातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मात्र, यावर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे.

महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनीही स्वतंत्र चौकशीची मागणी केली आणि त्याला त्यांंचे राजकीय विरोधक उत्पल पर्रीकर यांनी पाठिंबा दिला आहे. असे असले तरी या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमण्याची किंवा हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची शक्यता पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी फेटाळली आहे. न्यायालयीन चौकशीवर सरकारी पातळीवर अद्याप मौन आहे.

या प्रकरणाची तात्काळ न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षांकडून होत असल्याच्या प्रश्नावर पोलिसच या प्रकरणाची सखोल चौकशी करतील, अशी भूमिका अधीक्षक सावंत यांनी मांडली. याप्रसंगी पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई, उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा, उत्तर गोवा जिल्हा अधीक्षक अक्षत कुमार यांची उपस्थिती होती.

पूजा नाईकला पणजी पोलिसांकडून अटक

पूजा नाईक हिला फोंडा येथील न्यायालयात जामीन मिळाल्यानंतर तिला पणजीतील एका फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे.

...तर निष्पक्ष चौकशीची भीती का? : काँग्रेसचा सवाल

गेल्या दहा वर्षांपासून गोव्यात सुरू असलेल्या नोकरी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी आयोगाच्या मागणीचा पुनरुच्चार काँग्रेसने केला आहे. पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी या घोटाळ्यात राजकारण्यांचा सहभाग नसल्याचा दावा केल्यानंतर ही मागणी केली आहे.

संशयितांचे कॉल रेकॉर्ड तपासा

गोवा पोलिसांनी कधीही इतक्या खालच्या स्तरावर जाऊन राजकीय दबावाखाली काम केल्याचे दिसले नव्हते; परंतु सध्या ते ‘हिज मास्टर्स व्हॉईस’ (त्यांच्या मालकाच्या आदेशांवर) चालल्याचे दिसते, असे ‘आप’चे गोवा राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर यांनी म्हटले आहे. सर्व संशयितांच्या मागील एका वर्षाच्या कॉल रेकॉर्डस सार्वजनिक कराव्यात तसेच तपास प्रक्रियाही जनतेसमोर आणावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ताम्हणकरांकडून मागविली माहिती

सार्वत्रिक झालेल्या ध्वनिफितप्रकरणी आमदार गणेश गावकर यांची चौकशी सुरू असल्याचेही सावंत नमूद केले. याप्रकरणी तक्रारदार सुदीप ताम्हणकर यांच्याकडून अधिक माहिती कुळे पोलिसांनी मागितली आहे. या प्रकरणाची सुई राजकारण्‍यांपर्यंत वळेल, असे वाटत असतानाच पोलिसांनी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा यानंतर सुरू झाली आहे. विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने या प्रकरणी न्यायालयीन चौकशी न केल्यास सोमवारपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

भक्कम पुरावे हाती

या प्रकरणांत बँकांतर्फे काही व्यवहार झाल्याचे आढळून आहे काय? यावर महासंचालकांनी ‘होय, काही व्यवहार सापडले असून, ते भक्कम पुरावे ठरू शकतात’, असेही स्पष्ट केले. याशिवाय ज्यांच्याकडून संशयितांनी पैसे घेतले आहेत, त्यांची रक्कम परत करण्यासाठी संशयितांची मालमत्ता जप्त करण्याविषयी प्रशासकीय व कायदेशीररित्या कार्यवाही करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT