Pooja Naik job scam Goa Dainik Gomantak
गोवा

"पूजा नाईकने यापूर्वी कोणाचेही नाव घेतले नव्हते", CM सावंतांनी सांगितले 'नवीन FIR' चे कारण

Goa cash for job scam FIR: गोव्यातील 'कॅश फॉर जॉब' घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी पूजा नाईक हिच्या नवीन विधानानंतर आता या प्रकरणाचा तपास अधिक सखोल झाला आहे

Akshata Chhatre

पणजी: गोव्यातील 'कॅश फॉर जॉब' घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी पूजा नाईक हिच्या नवीन विधानानंतर आता या प्रकरणाचा तपास अधिक सखोल झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी नवीन एफआयआर दाखल करण्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे.

जुन्या तपासात 'पैसे' देणाऱ्यांचे नाव नव्हते

पूजा नाईकने नुकताच दावा केला होता की, तिने एक मंत्री, आयएएस अधिकारी आणि अभियंत्याला सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी १७ कोटी रुपये रोख दिले होते. या स्फोटक विधानानंतर, माध्यमांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाबद्दल विचारले असता, त्यांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, "पूजा नाईकच्या विधानानंतर तिच्या प्रकरणाची कसून चौकशी करणे महत्त्वाचे होते. पूर्वी तिने किती लोकां कडून पैसे घेतले आहेत, हे सांगितले नव्हते. त्यामुळेच एक नवीन एफआयआर दाखल करण्यात आला असून, सखोल तपास सुरू आहे." मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, नाईकने पूर्वीच्या तपासात काही व्यक्तींकडून पैसे घेतल्याचे कबूल केले नव्हते, ज्यामुळे नवीन तपासणी करणे आवश्यक झाले आहे.

पुरावे मिळेपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया नाही

तपास अजूनही सुरू असल्याने, मुख्यमंत्री सावंत यांनी कोणत्याही मंत्र्याचे किंवा अधिकाऱ्याचे नाव जाहीर करण्यापूर्वी पुरावे आवश्यक असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री म्हणाले की, "तपास अजूनही सुरू आहे आणि जोपर्यंत आमच्याकडे पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत मी किंवा पोलीस याबद्दल काहीही बोलू शकत नाही. या प्रकरणाचा कसून आणि तपशीलवार तपास केला जाईल." पूजा नाईकने नाव घेतलेल्या मंत्री, आयएएस अधिकारी आणि अभियंत्यांभोवती आता चौकशीचे वलय अधिक घट्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bomb Threat: दिल्ली स्फोटानंतर 5 आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, इंडिगो एअरलाईन्सला ई-मेल आल्याने खळबळ; सुरक्षा यंत्रणा अलर्ट

Goa Politics: गोव्यात 'व्यापम'पेक्षा मोठा घोटाळा! 'त्या' मंत्र्याला त्वरित हाकलून लावा; काँग्रेस मागणीवर ठाम

VIDEO: चीनमधील सर्वात उंच 'होंगची पूल' कोसळला! काही सेकंदात पुलाचे खांब नदीत धसले; भूस्खलनाचा थरार व्हिडिओमध्ये कैद

IND vs SA, Head To Head Record: ईडन गार्डन्स कोणासाठी लकी? टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कामगिरी कशी? जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड

Delhi Car Blast: दिल्ली ब्लास्टचे पाकिस्तान कनेक्शन! संशयितांच्या चौकशीतून दहशतवादी संघटनेशी जुळले तार; जै-ए-मोहम्मदचा कमांडर निशाण्यावर

SCROLL FOR NEXT