Cash For Job Scam Canva
गोवा

Cash For Job: ‘कॅश फॉर जॉब’प्रकरणी 2 वर्षांत 41 गुन्हे, 34 प्रकरणांचे तपासकाम सुरू; विधानसभेत तारांकीत प्रश्‍नावर माहिती

Goa Assembly Session: ७ प्रकरणांमध्ये विविध न्यायालयात आरोपपत्रे दाखल झाली आहेत तर ३४ प्रकरणांचे तपासकाम सुरू आहे, अशी माहिती आज विधानसभेत तारांकित प्रश्‍नावर देण्यात आली.

Sameer Panditrao

Cash for Job Scam Cases Registered

पणजी: राज्यातील ‘कॅश फॉर जॉब’प्रकरणी दोन वर्षात (२०२३ व २०२४) ४१ गुन्हे नोंद झाले असून त्यापैकी ७ प्रकरणांमध्ये विविध न्यायालयात आरोपपत्रे दाखल झाली आहेत तर ३४ प्रकरणांचे तपासकाम सुरू आहे, अशी माहिती आज विधानसभेत तारांकित प्रश्‍नावर देण्यात आली. ही सर्व प्रकरणांचा तपास संबंधित क्षेत्रातील पोलिस स्थानकांमार्फत सुरू आहे, अशी माहिती विधानसभेतील एका तारांकित प्रश्‍नावरील उत्तराला देण्यात आली आहे.

सरकारी खात्यात नोकऱ्यांसाठी भरमसाट रोख रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी २०२३ मध्ये ७ तक्रारी नोंद झाल्या होत्या त्यामध्ये म्हापसा पोलिस स्थानकात २, कोलवाळ, डिचोली, वाळपई, मायणा - कुडतरी व वेर्णा येथे प्रत्येकी एक गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणांची दखल पोलिसांनी न घेतल्याने तपासकाम रखडला होता.

मात्र गेल्यावर्षी ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्याची राज्यात खळबळ उडाल्यानंतर कोलवाळ, डिचोली, वाळपई व मायणा - कुडतरी येथील प्रकरणांचा तपास पूर्ण होऊन संबंधित क्षेत्रातील न्यायालयात आरोपपत्रे दाखल झाली आहेत. म्हापशातील २ व वेर्ण्यातील एका प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे.

सुमारे ८ कोटींचा गंडा; महिला सूत्रधार

राज्यात ऑक्टोबर २०२४ मध्ये ‘कॅश फॉर जॉब’प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर एकूण ३४ गुन्हे नोंद झाले. यात बहुतांश महिला सूत्रधार असल्याचे उजेडात आले होते. सुमारे ८ कोटींची फसवणूक सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे दिलेल्यांची झाली होती. पणजी पोलिस स्थानकात ४, जुने गोवे पोलिस स्थानकात १, आगशी येथे ३, म्हापसा १, कोलवाळ १, पर्वरी २, डिचोली ६, मडगाव १, काणकोण २, वास्को ७, मुरगाव १, फोंडा ३ तर म्हार्दोळ पोलिस स्थानकात ३ गुन्हे नोंद झाले आहेत. यापैकी पर्वरी, फोंडा व डिचोलीतील प्रत्येकी एका गुन्‍ह्यामध्ये पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT